घरविशेषकुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न?

कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न?

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल

कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे.

कुर्ल्यातील आयटीआय परिसरात मागील दोन महिन्यांपासून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या नावे एक पारंपरिक मराठमोळं खेळांचं मैदान तयार होत आहे. येत्या १३ ऑगस्टला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य देशी आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे, अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

हे ही वाचा : 

‘स्वायत्त महाराष्ट्र’च्या नावाने देशद्रोही पोस्ट करणाऱ्या एक्स अकाऊंटवर बंदी घाला, अटक करा!

काँग्रेसकडून आंबेडकर विरोधी वक्तव्य

छांगुर बाबावर मुख्यमंत्री योगी काय म्हणाले ?

सिंधिया यांनी सिस्कोच्या सीईओसोबत घेतली भेट

ते पुढे म्हणाले, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्रास न होता, इतर खेळाडूंना प्रवेश मिळावा याकरिता मागील बाजूला पायवाट व द्वार बांधण्याचं काम सुरू झालं होतं. या पायवाटेमुळे आयटीआयच्या बाहेरील बाजूला वाढलेल्या रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना अडथळा होईल ही भीती आदित्य ठाकरे यांना वाटत असावी.

मुंबईत प्रथमच मराठमोळं पारंपरिक खेळांचं मैदान होत आहे, त्याचं स्वागत करण्याऐवजी, रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न का?” असा रोखठोक प्रश्न मंत्री लोढा यांनी यावेळी विचारला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version