घरविशेषअमृता फडणवीस हिंदीतून घेऊन आल्या 'मणिके मागे हिथे'

अमृता फडणवीस हिंदीतून घेऊन आल्या ‘मणिके मागे हिथे’

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या गायनासाठी कायमच चर्चेत असतात. मराठी आणि हिंदी भाषेत त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत. अशातच आता अमृता ‘मणिके मागे हिथे’ या प्रसिद्ध गाण्याचे हिंदी व्हर्जन घेऊन आल्या आहेत. विशेष म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने अमृता या रॅप करतानाही दिसणार आहेत.

इंस्टाग्राम या जगप्रसिद्ध सोशल मीडिया साईटने रिल्स हा प्रकार आणल्यापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात नव्या टॅलेंटला संधी मिळाली आहे. या रिल्सच्या माध्यमातून अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत. त्यातलेच एक नेटकाऱ्यांच्या पसंतीचे गाणे ठरले ‘मणिके मागे हिथे’. मूळचे सिंहली भाषेत असलेले हे गाणे योहानी या श्रीलंकन गायिकेने गायलेले आहे. या गाण्याने इंस्टाग्राम वर धुमाकूळ घातला आहे.

हे ही वाचा:

योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!

‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’

दक्षिणेत पुराचे थैमान सुरूच

ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?

याच गाण्याचे हिंदी व्हर्जनअमृता फडणवीस घेऊन आल्या आहेत.’बाहो मे सिमट जा, मुझसे तू लिपट जा’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचा १ मिनिट ५० सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. अमृता यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी ‘गरमा गरमीच्या या राजकीय चर्चांमधून थोडा वेळ काढून हे गाणं बघा’ असे अमृता यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version