घरराजकारणउद्धव ठाकरे स्वपक्षातील 'रिजिम चेंज' थांबवू शकले नाहीत!

उद्धव ठाकरे स्वपक्षातील ‘रिजिम चेंज’ थांबवू शकले नाहीत!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला टोला

सध्या विरोधी पक्षांच्या तोंडी रिजिम चेंज हा शब्द वारंवार ऐकू येत आहे. उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एका भाषणात बोलताना आम्ही रिजिम चेंजसाठीच उभे आहोत, असे वक्तव्य केले. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेनेतील रिजिम चेंजला थांबवू शकले नाहीत तर ते आणखी कोणत्या रिजिम चेंजबद्दल बोलत आहेत, हे ठाऊक नाहीत. ज्या वेळी त्यांच्या पक्षाने हिंदुत्वाचा त्याग केला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांना सोडले, त्यांच्या पक्षातच असे काही वादळ आले की, ज्यांना बाळासाहेबांच्या विचारावर वाटचाल करायची होती, त्यांनी खरी शिवसेना उभी केली.

उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, प्रशांत भूषण रिजिम चेंजबद्दल बोलले होते. होय, आम्ही रिजिम चेंज करणार आहोत. जर आमची मतं व्यक्त करण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेत असाल तर आम्ही ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत.

हे ही वाचा:

दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस

भारतातून पळाल्यावर ध्रूव राठीचे लंडनमध्ये आंदोलन

दिल्लीतील आंदोलनांचा व्यापाराला मोठा फटका

जिओ विणणार १६०० उपग्रहांचं जाळं

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी म्हटलंय की, संविधानाविरोधात लढणे बंद करा. इथे निर्णय संसदेत होतील, रस्त्यावर नाही. लोकशाहीत निर्णय निवडणुकीद्वारे होईल. तरीही तुम्हाला रिजिम चेंज करायेच असेल तर तुम्हाला निवडणूक जिंकावी लागेल, लोकांची मने जिंकावी लागतील. जे स्वप्ने पाहात आहेत, की इथे भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशसारखा सत्तापालट होईल, त्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version