काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल प्रकरण:”ही शिक्षा नाही, फक्त अंतर्गत तडजोड”

केरळ शिक्षण मंत्र्यांचा आरोप

काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल प्रकरण:”ही शिक्षा नाही, फक्त अंतर्गत तडजोड”

पलक्कडचे काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांच्यावर महिलांकडून गैरवर्तनाच्या गंभीर तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केल्याची घोषणा केली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, केरळ राज्याचे शिक्षणमंत्री वी. शिवनकुट्टी यांनी काँग्रेसवर आणि राहुल ममकूटाथिल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शिक्षणमंत्री वी. शिवनकुट्टी म्हणाले, “राहुल ममकूटाथिल यांच्याविरोधातील ही कारवाई चुकीसाठी दिलेली शिक्षा नाही, तर काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत तडजोड आहे. जेव्हा पक्ष कठोर कारवाई करण्याच्या तयारीत होता, तेव्हा राहुल यांनी धमक्यांचा वापर केला आणि त्यामुळे नेत्यांचा पवित्रा सौम्य झाला.”

काँग्रेसकडून त्यांची हकालपट्टी ही न्याय्य कारवाई असती. “पलक्कडमधील जनतेची मागणी आहे की त्यांनी आमदारपदाचा राजीनामा द्यावा. राहुल ममकूटाथिल यांच्या नेतृत्वाखाली एक गुन्हेगारी टोळी कार्यरत आहे आणि सायबरहल्ल्यांमागे हाच गट आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “राहुल ममकूटाथिल यांनी आमदारपदाचा राजीनामा दिलेला नाही, यामागचं मुख्य कारण म्हणजे पलक्कडमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता. काँग्रेस पक्षाला या पोटनिवडणुकीची भीती वाटते आणि त्यामुळेच ते त्यांच्या आमदारावर कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.”

हे ही वाचा : 

झारखंडमधील सुर्या हांसदा प्रकरण: “ही बनावट चकमक होती”

पाकिस्तानात जन्मलेल्या क्रॅस्टोला १९ वर्षांनी मिळाले भारतीय नागरिकत्व!

वांद्रे येथे साकारतेय ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिर!

अमेरिकेकडून भारतावर २५% अतिरिक्त आयात कराची नोटीस जारी!

दरम्यान, काँग्रेसने सध्या राहुल ममकूटाथिल यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांच्या विरोधात महिलांकडून गैरवर्तनाचे गंभीर आरोप झाले आहेत. पक्षांतर्गत कारवाई ही तडजोड म्हणून पाहिली जात असल्याचे मत सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

https://twitter.com/ANI/status/1960214489082601733

Exit mobile version