नवरात्री हा स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा उत्सव. नवरात्रीच्या काळात प्रत्येक स्त्रीचा, मग ती कोणत्याही घटकातील असो, तिचा सन्मान करणे हीच खरी देवीची आराधना आहे. दीपस्तंभ मनोबल ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून समाजातील विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे, त्यांना आधार देण्याचे काम करत आहे. दोन तृतीयपंथी मुलींना मदत करून त्यांना सर्वतोपरि सहकार्य करण्याचे कामही ही संस्था करते आहे.
हे ही वाचा:
विक्रमी सहाव्या जेतेपदासाठी भारतीय हॉकी संघ सज्ज!
दुग्धालयात राहुल गांधींना हवाय खिमा पाव…
सप्टेंबरमध्ये एसआयपी गुंतवणुकीत ३२,४९० कोटी रुपयांची विक्रमी भर
या दोन तृतीयपंथी मुली उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असताना त्यांना येत असलेल्या अडचणी, सामाजिक आव्हाने आणि भविष्याबद्दलच्या चिंता या सर्व विषयांबाबत संस्था कायमच त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभी असते. ‘माहेर’ मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या भारतीय स्त्री शक्तीच्या केंद्रीय सचिव वर्षा पवार तावडे यांनी या दोन्ही मुलींबरोबर संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेऊन त्यांना कसे सहकार्य करता येईल, या दृष्टीने आवश्यक माहिती घेतली.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे या मुलींच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
