घरविशेषपाकिस्तानी कंटेंट भारतात दाखवू नका!

पाकिस्तानी कंटेंट भारतात दाखवू नका!

केंद्राची नेटफ्लिक्सला सूचना

पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांच्या आगामी वेबसीरिजवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नेटफ्लिक्सला महत्त्वाची सूचना केली आहे. पाकिस्तानमधून तयार होणारा कोणताही कंटेंट भारतातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देऊ नये, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी कंटेंटच्या प्रसारणाबाबत ८ मे २०२५ रोजी जारी केलेल्या सरकारी निर्देशांचे पालन करण्यासही मंत्रालयाने बजावले आहे.

नेटफ्लिक्सची आगामी पाकिस्तानी वेबसीरिज ‘जो बचे हैं संग समेट लो’ ४ डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत फवाद खान, माहिरा खान, हानिया आमिर, अहद रजा मीर, इकरा अजीज आणि सनम सईद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र, ही मालिका भारतात प्रदर्शित होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

माहितीनुसार, जून २०२५ मध्ये नेटफ्लिक्सने केंद्र सरकारला आश्वासन दिले होते की, पाकिस्तानमध्ये तयार झालेला कोणताही चित्रपट किंवा वेबसीरिज भारतातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार नाही. आता सरकारने कंपनीला याच आश्वासनाचे पालन करण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा:

महापौर रितू तावडेंसह आयुक्त अश्विनी भिडेंना धमकीचा मेल

पासपोर्टमधील त्रुटींप्रकरणी सौरव दास विरोधात लूकआऊट सर्क्युलर

गुजरातमध्ये महामार्गावर उतरली लष्कराची विमाने

पाकिस्तानचे हित जपणारा पक्ष म्हणजे काँग्रेस!

दरम्यान, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूआयसीई) या चित्रपट क्षेत्रातील संघटनांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या मालिकेचे भारतातील प्रसारण रोखण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version