घरविशेषपुण्यातील हिंजवडीमध्ये टेंपो ट्रॅव्हलरला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील हिंजवडीमध्ये टेंपो ट्रॅव्हलरला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील हिंजवडी भागात एका टेंपो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. हे चारही जण व्योमा ग्राफिक्स कंपनीचे कर्मचारी होते. या टेंपोमध्ये कंपनीचे एकूण १२ कर्मचारी प्रवास करत होते. आगीमुळे संपूर्ण टेंपो जळून खाक झाला आहे.

हिंजवडी फेज-१ मध्ये चालकाच्या पायाजवळ अचानक आग लागली. त्यानंतर चालक आणि पुढील सीटवर बसलेले कर्मचारी तत्काळ खाली उतरले. मात्र, मागील दरवाजा उघडू न शकल्यामुळे चार जणांचा जळून मृत्यू झाला.

हेही वाचा..

जम्मूत दहशतवादाविरोधात मोठी कारवाई

ट्रम्प- पुतिन यांच्यात दोन तास चर्चा; युद्धबंदीवर काय झाले बोलणे?

स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलचे यशस्वी लँडिंग; सुनीता विल्यम्स २८६ दिवसांनी पृथ्वीवर परतल्या

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सदर घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version