घरविशेषअर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर चार अल्पवयीन मुले बुडाली; दोघं सुखरूप

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर चार अल्पवयीन मुले बुडाली; दोघं सुखरूप

दोघांचा शोध सुरू

पालघर जिल्ह्यातील विरार येथील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (१६ जुलै) दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी दोघांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर उर्वरित दोघे समुद्राच्या लाटांमध्ये बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सागरी बचाव पथक, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

माहितीनुसार, चारही मुले अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आली होती. दुपारच्या सुमारास त्यांनी समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी समुद्र खवळलेला होता आणि भरतीमुळे लाटांचा जोरही वाढला होता. अशा परिस्थितीत चारही जण खोल पाण्याकडे वाहू लागले आणि बुडू लागले.

घटनेची माहिती मिळताच समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर दोन मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र उर्वरित दोघे मुलगे समुद्रात बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा:

तृणमूलच्या राज्यसभा खासदार कोयल मलिक यांचा राजीनामा

“श्रीकृष्ण मुस्लिम होते, दिवसातून पाच वेळा नमाज पढत होते” मौलाना बरळले

दुसरीतील हिंदू विद्यार्थ्याला ‘कलमा’ पठणाचा गृहपाठ; शिक्षिकेची हकालपट्टी

‘अतिथी देवो भव’! महिला पोलिसांच्या मदतीने विदेशी पर्यटक भारावली

प्राथमिक माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावर तैनात पोलिसांनी आणि स्थानिकांनी मुलांना समुद्रात न उतरता सावध राहण्याचा इशारा दिला होता. मात्र हा इशारा दुर्लक्षित करून ते समुद्रात उतरल्याचे सांगितले जात आहे. काही क्षणांतच प्रचंड लाटांमुळे परिस्थिती गंभीर बनली आणि ही दुर्घटना घडली. घटनेनंतर अर्नाळा किनाऱ्यावर मोठी गर्दी झाली. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून बचावकार्य सुरू ठेवले आहे. भरती आणि खराब हवामानामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version