घरविशेषमहाराष्ट्रातील या मतदारसंघातून तब्बल ८५ टक्के मतदारांची नावे वगळली

महाराष्ट्रातील या मतदारसंघातून तब्बल ८५ टक्के मतदारांची नावे वगळली

राज्याच्या एसआयआरची प्रारूप यादी

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच एसआयआर प्रक्रियेतून मोठी आणि महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी २५ मतदारसंघांमध्ये प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांपैकी तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक नावे ही कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा सापडत नसलेल्या मतदारांची आहेत. यामध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला असून, येथे प्रारूप यादीत समाविष्ट न झालेल्या २ लाख ३८ हजार ७८९ मतदारांपैकी तब्बल ९४.७ टक्के मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा सापडत नसलेले आहेत. त्यानंतर ओवळा-माजिवडा मतदारसंघात हे प्रमाण ९३.३ टक्के, तर नालासोपारा मतदारसंघात ९३ टक्के आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये आणि वेगाने वाढणाऱ्या मतदारसंघांमध्ये मतदारांच्या स्थलांतराचा परिणाम या प्रक्रियेत प्रकर्षाने दिसून आला आहे.

राज्याच्या एकूण आकडेवारीनुसार, एसआयआर प्रक्रियेनंतर तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत. यापैकी ७६ लाख ७६ हजार १३५ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचे, तर ७५ लाख ४१ हजार २२९ मतदार सापडत नसल्याचे किंवा अनुपस्थित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही श्रेणी मिळून तब्बल १ कोटी ५२ लाखांहून अधिक नावे आहेत. याशिवाय ३४ लाख ८२ हजार २३१ मृत मतदारांची नावे, १७ लाख ६६ हजार ५०२ दुबार किंवा अन्यत्र नोंद असलेल्या मतदारांची नावे आणि २ लाख २२ हजार ३९० नावे इतर कारणांमुळे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. विशेष म्हणजे, राज्यातील ५९ मतदारसंघांमध्ये वगळलेल्या नावांपैकी ८० टक्क्यांहून अधिक नावे स्थलांतरित किंवा सापडत नसलेल्या मतदारांची आहेत.
हे ही वाचा:
नेपाळमध्ये जलप्रलयातील मृतांचा आकडा १,२७० पार

माथाडी युनियनच्या नावाने दहशत माजवणाऱ्या टोळीवर मोक्का

GSLV-F17 चे काउंटडाऊन सुरू; भारताचा पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह झेपावणार

ड्रोनपासून रणगाड्यापर्यंत… बेल्जियमसोबतच्या करारांमधून स्वदेशी उत्पादनाला चालना

मात्र, प्रारूप मतदार यादीत नाव नसणे म्हणजे मतदानाचा अधिकार कायमचा संपला, असा अर्थ होत नाही. निवडणूक आयोगाने ही अंतिम मतदार कपात नसल्याचे स्पष्ट केले आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान गणना अर्ज प्राप्त न झाल्यामुळे अनेक मतदारांची नावे प्रारूप यादीत पुढे नेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संबंधित मतदारांना आपले नाव तपासून दावा किंवा हरकत दाखल करण्याची संधी मिळणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळे सध्या समोर आलेली २ कोटींहून अधिक नावांची आकडेवारी महत्त्वाची असली, तरी अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी अंतिम मतदार यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version