२१ वी राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स स्पर्धा २०२६ ही पंजाबमधील लुधियाना येथील गुरु नानक स्टेडियमवर १ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मानस शिंदे याने २०० मीटर शर्यतीत २१.५१ सेकंदांची वेळ नोंदवत ‘नव्या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने २१.६५ सेकंदांचा जुना विक्रम मोडीत काढला.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मानसने ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले. मानस म्हणाला, “ही माझी दुसरी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. पदकापर्यंत मजल मारल्याचा मला आनंद आहेच, पण त्याहून अधिक समाधान या गोष्टीचे आहे की मी माझ्या प्रशिक्षकाची (नीलेश पाटकर) रणनीती यशस्वीपणे अंमलात आणली. मी गेल्या एका वर्षापासून कठोर परिश्रम करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या कुटुंबाचे मी या निमित्ताने आभार मानतो.
हे ही वाचा:
इशान किशनच्या शतकामुळे पूर्व विभाग मजबूत स्थितीत
मॅकडोनाल्ड्सच्या ‘एक्स’ अकाउंटवरुन इंटर्नचा पगार थकीत असल्याची पोस्ट
मोदींचा टोला…लाल किल्ल्यावरून दिली ‘दिमागी नक्षल’ची होमिओपॅथिक गोळी
सात्विक-चिराग जोडीने पहिल्यांदाच जिंकली चायना मास्टर्स
“स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ताप असूनही मानसने दोन्ही प्रकारांत आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी (पर्सनल बेस्ट) नोंदवली. त्याच्या प्रगतीबद्दल मी समाधानी आहे, तरीही मला वाटते की ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक थोडक्यात हुकले. मानसने यापूर्वी २०२५ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या ‘ज्युनियर नॅशनल्स’मध्ये सहभाग घेतला होता, जिथे त्याने पेंटाथलॉनमध्ये पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले होते. तो अत्यंत शिस्तप्रिय आणि समर्पित मुलगा आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे, अशा शब्दांत त्याचे प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी त्याचे कौतुक केले.
या प्रसंगी, मीनल पालंदे (उपायुक्त – टीएमसी) आणि अशोक आहेर (योजना प्रमुख) यांनी मानस व त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आणि त्याला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
