घरराजकारण‘डीजे वाजणारच, बंद करून दाखवा’

‘डीजे वाजणारच, बंद करून दाखवा’

राज ठाकरेंना गुणरत्न सदावर्तेंचे थेट आव्हान

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीजे आणि डॉल्बीच्या वाढत्या वापरावर आक्षेप घेत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका मांडली आहे. मोठ्या आवाजातील डीजेमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेऊन उत्सव साजरा करण्याबाबत त्यांनी भाष्य केले. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान देत “डीजे वाजणारच, तो बंद करून दाखवा,” असा इशारा दिला आहे. डीजेवर सरसकट बंदी घालण्याच्या भूमिकेला त्यांनी विरोध केला. एखाद्या व्यक्तीला डीजेच्या आवाजामुळे त्रास होत असेल तर त्याने आपल्याशी संपर्क साधावा, असेही सदावर्ते यांनी म्हटले. कायद्याचे उल्लंघन न करता उत्सव साजरा केला जात असेल, तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे डीजेच्या मुद्द्यावरून सदावर्ते आणि राज ठाकरे यांच्यातील शाब्दिक संघर्ष चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
मानस शिंदेने स्पर्धाविक्रमासह जिंकले सुवर्णपदक

मॅकडोनाल्ड्सच्या इंटर्नचा पगार थकला

दिल्लीत विद्यार्थ्यांचे वसतिगृह असलेली इमारत कोसळून २ मृत्युमुखी

भारताच्या ज्युनियर महिलांचा आशिया कप हॉकीत सलग दुसरा विजय

गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी आणि मोठ्या आवाजातील संगीताचा वापर हा दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. एका बाजूला गणेश मंडळांकडून उत्साहात मिरवणुका काढण्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि इतर नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यामुळे उत्सवाचा आनंद आणि ध्वनिप्रदूषणावरील नियम यामध्ये समतोल साधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मनसेकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version