घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमोदी १२ वर्षांनंतरही मजबूत, ट्रम्प २ वर्षांत आपटले कसे?

मोदी १२ वर्षांनंतरही मजबूत, ट्रम्प २ वर्षांत आपटले कसे?

अमेरिकेच्या २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हज आणि सिनेटवर डेमोक्रॅट्सचे निर्विवाद बहुमत निर्माण झाले आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात परराष्ट्र धोरणाचे झालेले पोतेरे आणि अर्थकारणाची झालेली माती हे घटक प्रभावी ठरले. रिपब्लिकन पक्ष उजवी विचारसरणी आणि कडव्या राष्ट्रवादासाठी ओळखला जातो. हा विचार २०२४ च्या निवडणुकीत उचलून धरत मतदारांनी ट्रम्प यांना विजयी केले. सत्ता टिकवण्यासाठी फक्त राष्ट्रवादाच्या बाता पुरेशा नसतात, जनतेला सर्वांगीण विकास आणि कल्याणकारी योजनांचीही आस असते. शासन भ्रष्टाचारमुक्त आणि प्रगतीशील असावे अशी अपेक्षा असते. हेच ट्रम्प यांच्या अपयशाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशाचे कारण आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर ट्रम्प यांच्या डोक्यात इतकी हवा गेली होती की, त्यांनी अमेरिकेच्या मित्रांना सतत डिवचले, दुखावले. ट्रम्प यांच्या कर्तृत्वामुळे मित्र शत्रू बनले. शत्रूंची संख्या वाढत गेली. वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी पाकिस्तानसारख्या सापाला गोंजारण्याचे धोरण स्वीकारले. त्याचा परिणाम मध्यावधीच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट दिसत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version