घरविशेषमी तुम्हाला ओळखतो, तुम्ही खूप प्रसिद्ध आहात!

मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही खूप प्रसिद्ध आहात!

इंडोनेशियन राष्ट्रपतींनी जयशंकर यांचे केले कौतुक

G२० शिखर परिषदेदरम्यान इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे कौतुक केले आहे. या भेटीचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. दरम्यान, G२० शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या शेवटच्या टप्प्यावर बुधवारी (२० नोव्हेंबर) गयानाला पोहोचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी द्विपक्षीय बैठकीला जाण्यापूर्वी एकमेकांची भेट घेतली. राष्ट्रपती सुबियांतो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन करत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी हस्तांदोलन केले आणि म्हणाले, ‘मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही खूप प्रसिद्ध आहात’. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे कौतुक ऐकून पंतप्रधान मोदीही हसले.

इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींची व्यापार, वाणिज्य, आरोग्य आणि सुरक्षा यासारख्या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा झाली. इंडोनेशियन राष्ट्राध्यक्षपदी प्रबोवो सुबियांतो यांची निवड झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.

हे ही वाचा : 

डोमिनिकानंतर गयाना आणि बार्बाडोसकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान जाहीर!

बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का? भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंना सवाल

विधानसभा २०२४: नेत्यांसह, खेळाडू आणि कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईत ३० हजार पोलीस तैनात

 

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version