घरविशेषहेड की टेल नाही, थेट ‘हेड’सोबत मार्श मैदानात!

हेड की टेल नाही, थेट ‘हेड’सोबत मार्श मैदानात!

दक्षिण आफ्रिका संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून तीन टी२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. रविवारी टी२० मालिकेला सुरुवात होत असून, त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श याने ओपनिंग जोडीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

मिशेल मार्शने स्पष्ट केलं आहे की, २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत ट्रेव्हिस हेड आणि तो स्वतः ऑस्ट्रेलियासाठी ओपनिंग करणार आहेत.

डेविड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर सलामीवीराच्या भूमिकेसाठी मार्श, ट्रेव्हिस हेड, मॅट शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क हे पाच प्रमुख पर्याय ऑस्ट्रेलियाकडे उपलब्ध आहेत.

ग्लेन मॅक्सवेलने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेत मार्शसोबत सलामी केली होती. मात्र मार्श आणि हेडने अद्याप एकत्रितपणे टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ओपनिंग केलेली नाही. त्यांनी वनडे सामन्यांमध्ये एकत्र सलामी दिली आहे. त्यांचं सरासरी भागीदारी ५० पेक्षा अधिक आहे आणि १२च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

मार्श म्हणाला, “निकट भविष्यात ट्रेव्हिस हेड आणि मीच ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर म्हणून खेळणार आहोत. आम्ही दोघांनी खूप क्रिकेट एकत्र खेळलं आहे आणि आमचं समजूतदारपणाही चांगलं आहे.”

३३ वर्षीय मार्श चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत पुनरागमन करताना त्याने संघाला ५-० अशी ऐतिहासिक मालिका जिंकून दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी अंतिम संघाबाबत मार्शने स्पष्टता दिली नसली तरी टिम डेविडला वरच्या क्रमांकावर खेळवण्याचा संकेत दिला.

टिम डेविडने वेस्ट इंडिज दौऱ्यात फक्त ३७ चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं.

त्यावर बोलताना मार्श म्हणाला, “बॅटिंग ऑर्डरबाबत आमचं बोलणं झालं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला वरती पाठवण्यात आलं होतं. तो जितक्या जास्त चेंडूंना सामोरा जाईल, तितक्या जास्त सामन्यांमध्ये विजय मिळवण्याची शक्यता आमची वाढते.”

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका १० ते २४ ऑगस्ट दरम्यान डार्विन, केर्न्स आणि मॅके येथे खेळवली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version