घरविशेषबोरिवलीचा काजूपाडा परिसर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणला

बोरिवलीचा काजूपाडा परिसर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणला

रस्त्यावरील पाकिस्तानचा रंगवलेला झेंडा पुसून टाकल्यानंतर व्यक्त झाला संताप

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ हिंदूंना मारण्यात आल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात आंदोलने केली जात आहेत. पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिकटवून तो तुडवण्याचे आंदोलन अनेकांनी घेतले आहे.

बोरिवली पूर्वेतील काजूपाडा येथे १ मे या महाराष्ट्र दिनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर रंगवला आणि तो तुडवण्याची व्यवस्था केली. मात्र तेथील पोलिसांनी काही पाकिस्तान समर्थकांच्या तक्रारीवरून त्या झेंड्याला पांढरा रंग लावून तो पुसण्याचा प्रयत्न केला. त्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्या विरोधात मग याच कार्यकर्त्यांनी त्याचदिवशी सायंकाळी आपला तीव्र संताप आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला.

हे ही वाचा:

एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ शो अखेर उल्लू ॲपने घेतला मागे!

बोरिवलीचा काजूपाडा परिसर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणला

“आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल…” केरळमधील कार्यक्रमात नरेंद्र मोदी असे का म्हणाले?

“शरद पवारांना अमित शाहांचा राजीनामा नकोय, तर मग…” संजय राऊतांचा सवाल

उत्तर मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, वॉर्ड क्रमांक ११ चे भाजपा अध्यक्ष दीपेश वर्तक, कुणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. त्यावेळी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. हातात तिरंगा धरलेले महिला व पुरुष आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवाय, रस्त्यावर पाकिस्तानचा झेंडा रंगवलेला असताना तो पांढऱ्या रंगाने पुसून टाकण्यात दहिसर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मदत केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी पाकिस्तानी समर्थकांना का सहाय्य केले, असा संतप्त सवाल आंदोलक विचारत होते. पाकिस्तानबद्दल ज्यांना निष्ठा आहे, त्यांनी भारतातून चालते व्हावे अशी घोषणाही यावेळी देण्यात आली.

यानंतर आंदोलनात पाकिस्तानी झेंडे आणून ते जाळण्यात आले आणि पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यातील सहभागाबाबत तीव्र निषेध करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version