घरविशेषभारताने हल्ला केला तर अणुबॉम्ब टाकून सर्व नष्ट करू!

भारताने हल्ला केला तर अणुबॉम्ब टाकून सर्व नष्ट करू!

पाकिस्तानी पंतप्रधानांचे विशेष सल्लागार राणा सनाउल्लाह यांची धमकी 

- Advertisement -

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एकमागून एक घेतलेल्या कठोर निर्णयामुळे पाकिस्तान संतापला आहे. भारताच्या हल्ल्याची भीती असूनही बिनबुडाच्या धमक्या पाक सरकार देत आहे. याच दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधानांचे विशेष सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.

भारतीय सैन्याने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही भारतावर अणुबॉम्ब टाकू. मग त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. आम्ही जगातील एक न्युक्लिअर पॉवर आहोत. युद्ध झाल्यास आम्ही अणुबॉम्ब टाकून सगळे नष्ट करु, अशी धमकी राणा सनाउल्लाह यांनी भारताला दिली आहे.

दरम्यान, भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.  १२० किलोमीटरवर मारा करणाऱ्या ‘फतेह’ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे ‘फतेह’ क्षेपणास्त्र आहे.

या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगाच्या पाठीवर एकटा पडलेल्या पाकिस्तान मदतीसाठी तुर्कस्त्नान धावून आला आहे. तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानच्या कराची बंदरावर दाखल झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आपण पाकिस्तानच्या लोकांसोबत असल्याचे तुर्कस्तानसोबत असल्याचे जाहीर केले होते.

हे ही वाचा : 

‘पाकवर हल्ला कधी होणार’ या प्रश्नामागचा अर्थ समजून घ्या…

एअरगनने दोन डझनहून अधिक माकडांची हत्या!

महाकुंभमधील रुपवती हर्षा रिछारियाने लग्नाचा प्रस्ताव देणाऱ्या अस्लमला दिली तंबी

पाकिस्तानला निसर्गाचाही झटका, भूकंपाचे धक्के

तर दुसरीकडे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची पाकिस्तान दौऱ्यावर गेले आहेत. पाकिस्तानी नेत्यांशी महत्वाच्या विषयांवर ते चर्चा करणार आहेत. भारत-पाकिस्तान संबंध विकोपाला गेला असताना या दौऱ्याला विशेष महत्व आले आहे. दक्षिण आशियातला भारताचा सच्चा मित्र अशी इराणची ख्याती आहे. या संघर्षाच्या काळात इराण पाकिस्तानबाबत काय भूमिका घेणार याकडे भारताचे लक्ष आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version