घरविशेषबिहारमध्ये मतदार यादीत हिंदू कुटूंबात मुस्लिम नावे

बिहारमध्ये मतदार यादीत हिंदू कुटूंबात मुस्लिम नावे

निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा

बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यापासून जवळ असलेल्या साक्रा विधानसभा मतदारसंघातील काटेसर पंचायतीचा मोहनपूर टोला या भागातून वेगळाच प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सुधारणेनंतर प्रारूप मतदार यादी जाहीर केली असता यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मतदार यादीत अचानक मुस्लीम नावे जोडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

गावकऱ्यांच्या मते, मोहनपूर टोला या भागात सुमारे ५०० हिंदू कुटुंबे राहतात. एकही मुस्लिम कुटुंब राहत नसल्याची माहिती आहे. मात्र, अलीकडेच, जेव्हा निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सुधारणेनंतर प्रारूप मतदार यादी जाहीर केली तेव्हा गावातील शेकडो घरांमध्ये मुस्लिम मतदारांची नावे आढळून आली. काही घरांमध्ये दोन नावे जोडण्यात आली, तर काही घरांमध्ये आठ ते दहा नावे जोडण्यात आली आहेत.

हे ही वाचा : 

‘उत्तम!! रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर कर लावाच!’

हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात दगडफेक; सात जणांच्या आवळल्या मुसक्या

शशी थरूर म्हणतात, भारत झुकेगा नही!

डोके ठिकाणावर आल्याचे संकेत ?

आरोग्य विभागातील निवृत्त कर्मचारी कामेश्वर ठाकूर यांच्या कुटुंबात सहा मतदार आहेत, परंतु त्यांच्या यादीत आणखी दोन मुस्लिम नावे जोडण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे माथुर ठाकूर आणि दिलीप ठाकूर यांच्या कुटुंबात पाच मतदार होते, परंतु यादीत आणखी चार मुस्लिम नावे जोडण्यात आली आहेत. तसेच वर्षानुवर्षे बंद असलेल्या अनेक घरांच्या मतदार यादीत मुस्लिम मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मुस्लिम नावे जोडली जाणे ही साधी चूक नसून हा मोठा कट असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच भविष्यात या चुकीमुळे त्यांच्या जमीन आणि मालमत्तेवरही वाद निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मतदार यादीतील त्रुटी लवकर दुरुस्त न केल्यास ते निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version