घरविशेषदेशात ७० दिवसातील सर्वात कमी कोरोना रुग्ण

देशात ७० दिवसातील सर्वात कमी कोरोना रुग्ण

कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात परिस्थिती काही अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील ७० दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ८४,३३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, ४००२ रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या २४ तासांत १ लाख २१ हजार ३११ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जे पाहता तब्बल ४० हजार ९८१ सक्रिय रुग्ण कमी झाल्याची बाब समोर आली. यापूर्वी १ एप्रिलला देशात  ८१,४६६  कोरोनबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात कोरोना रुग्णसंख्येत होणारी कपात दिलासादायक असली तरीही, प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आज देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना विषाणूमुळं संक्रमित झालेले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. ११ जूनपपर्यंत देशात २४ कोटी ९६ लाख कोरोना लसी देण्यात आल्या. तर कोरोना चाचण्यांनी देशात ३७ कोटी ६२ लाखांचा आकडा गाठला आहे.

हे ही वाचा:

भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेची तयारी सुरु

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी

भाजपा खासदारावर हल्ला, तृणमूल काँग्रेसवर आरोप

देशातील कोरोना मृत्यूदर १.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांहून जास्त झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येचं प्रमाण ४ टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर  पोहोचला आहे. तर एकूण बाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version