घरविशेषमंत्री संजय राठोड यांच्या गाडीला अपघात

मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला अपघात

एअरबॅग्जमुळे संजय राठोड वाचले

शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात त्यांच्या चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, सुदैवाने गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड यांचा जीव वाचला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

यवतमाळमधील कोपरा या गावात मध्यरात्री दोन वाजता हा अपघात झाला. यात चालक गंभीर जखमी झाला आहे. तर, संजय राठोड यांचा जीव वाचला आहे. मंत्री संजय राठोड यांच्या गाडीने मागून पिकअपला धडक दिली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा..

दुर्गेचे दुसरे रूप ‘ब्रह्मचारिणी’ – देवी प्रसिदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा

अटल सेतुवर एका आठवड्यात दोन आत्महत्या, दोन्ही मृतदेह सापडले!

उबाठाचे गाणे ‘उतलो माय, मातलो गं माय’ असं हवं होतं !

कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण : पीडितेचा पुतळा बसवण्यावरून वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवीला भेट देणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे होते. ते रात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान पोहरादेवी येथून निघाले. ते पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. मात्र, आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. संजय राठोड ३ ऑक्टोंबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर होते. रात्री उशिरा प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. ज्या गाडीला धडक दिली त्या पिकअपचा ड्राइव्हरही जखमी झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version