घरविशेष'मारुती'ची झेप; जीएसटी सुधारणेनंतर बुकिंग वाढले!

‘मारुती’ची झेप; जीएसटी सुधारणेनंतर बुकिंग वाढले!

कारच्या किमतीत घट झाल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कार शोरूममध्ये ग्राहकांनी गर्दी केल्याने ऑटोमोबाईल उद्योगासाठी उत्सवाच्या हंगामाची जोरदार सुरुवात झाली आहे. नवीन GST २.० सुधारणा लागू झाल्यामुळे कारच्या किमतीत घट झाल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. सणासुदीचा उत्साह आणि स्वस्त दर यांचा एकत्रित परिणाम म्हणून मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून, कंपनीची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

मारुती सुझुकीचे मार्केटिंग आणि विक्री विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की,”ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. गेल्या ३५ वर्षांत असा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला कधीच मिळाला नव्हता. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आम्ही ८०,००० चौकशी नोंदवल्या असून २५,००० हून अधिक गाड्या आधीच वितरित करण्यात आल्या आहेत. लवकरच ही संख्या ३०,००० पर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.

१८ सप्टेंबरपासून, जेव्हा आम्ही जीएसटी व्यतिरिक्त अतिरिक्त दर कपात जाहीर केली, तेव्हापासून आतापर्यंत ७५,००० बुकिंग्स मिळाली आहेत. सध्या आम्हाला दररोज सुमारे १५,००० बुकिंग्स मिळत असून, ही संख्या नेहमीपेक्षा सुमारे ५०% जास्त आहे. विशेषतः लहान कार्ससाठी मागणी खूपच वाढली आहे, बुकिंग्समध्ये जवळपास ५०% वाढ झाली आहे.”

ते पुढे म्हणाले, “चौकशींची संख्या प्रचंड आहे आणि काही विशिष्ट मॉडेल्ससाठी स्टॉक संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्राहकांना वेळेत डिलिव्हरी मिळावी यासाठी आमचे डीलर्स रात्री उशिरापर्यंत शोरूम्स उघडे ठेवत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा ग्राहक प्रतिसाद अपवादात्मकपणे चांगला आहे.”

चेन्नईतील मारुती शोरूममध्ये, व्यवस्थापकांनी जीएसटी दर सुसूत्रीकरण लागू झाल्यामुळे ग्राहकांना मिळणारे फायदे अधोरेखित केले. शोरूमचे व्यवस्थापक शिवराज यांच्या मते, स्लॅबमध्ये कपात केल्यामुळे सप्टेंबरमध्ये सुमारे २ हजार कार आधीच बुक झाल्या आहेत. “गेल्या महिन्यात, जीएसटी दर कपातीमुळे २ हजारांहून अधिक बुकिंग झाली आहेत. आज नवीन किमती आल्या आहेत,” असे व्यवस्थापकाने एएनआयला सांगितले. ” जीएसटीपूर्वी कारची किमान किंमत सुमारे ४.५ लाख होती, आता ती ३.४ लाखांपर्यंत कमी केली जाईल,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

नागपूर: गरबा कार्यक्रमांमध्ये गैर-हिंदूंना रोखण्यासाठी प्रवेशद्वारांवर ‘वराह अवतार’च्या प्रतिमा

पॅलेस्टाईनला पाठिंबा नाकारल्यावर इटलीत आंदोलन; मेलोनीविरोधात संताप!

कोलकातामध्ये मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, पाच जणांचा मृत्यू!

मोदी कमजोर पंतप्रधान म्हणतोय राहुल शक्तिमान

कंपनीने दिवाळीनिमित्त एक खास ऑफरही जाहीर केली आहे. यासंदर्भात व्यवस्थापकांनी सांगितले की, सध्या अनेक ग्राहक दुचाकीऐवजी थोडा जास्त खर्च करून चारचाकी खरेदी करण्याकडे वळत आहेत. “४.५ लाखांच्या आत आपण कार खरेदी करू शकतो.

उदाहरणार्थ, एखादा ग्राहक दुचाकी शोरूममध्ये गेला, तर त्याला सुमारे २ लाख रुपये खर्च येतो. मात्र, अतिरिक्त २ लाख रुपये खर्च करून तो सहज कार खरेदी करू शकतो. सध्या लागू झालेली जीएसटी कपात ही कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी ठरत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले,”जीएसटी सुधारणा, सणासुदीचा शुभ मुहूर्त आणि किमतीतील कपात यांचा संयोग झाल्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला असून, त्याचा थेट परिणाम विक्री वाढीवर दिसून येत आहे.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version