घरविशेष'न्यूज डंका' आता ऍपवरही!!

‘न्यूज डंका’ आता ऍपवरही!!

राष्ट्रवादाचा बुलंद आवाज असलेल्या न्यूज डंका या वेबपोर्टलचे ऍप आता आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी बातम्या, लेख आणि व्हिडिओ आता सहजपणे वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत.

दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त न्यूज डंका या वेबपोर्टलचे अनावरण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. अल्पावधीतच न्यूज डंकाच्या वेबपोर्टलने सुमारे अडीच लाख हिट्स मिळवून वाचकांच्या मनात वेगळीच छाप उमटवली आहे. आता यापुढे एक पाऊल टाकत, न्यूज डंकाने आपले ऍपदेखील चालू केले आहे.

न्यूज डंकाने सातत्याने राष्ट्रवादी बातम्या देण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. तरीही वाचकांसाठी वैविध्यपूर्ण आशय लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या प्रसिद्ध कलाकारांच्या मुलाखती, विविध विषयांना वाहिलेले व्हिडिओ, वेगवेगळ्या तऱ्हेचे लेख असा चोखंदळ आशय वाचकांसमोर सातत्याने मांडण्यात आला आहे. त्यामुळेच लोकांनी देखील पसंतीची थाप पाठीवर मारली आहे. वाचकांकडून असाच भरगोस प्रतिसाद ऍपला देखील मिळेल असा विश्वास न्यूज डंकाच्या टीमला वाटत आहे.

न्यूज डंका आयओएस ऍपदेखील सुरू करण्याचा मानस आहे. मात्र एँड्रॉईड ऍप आल्याने आता वाचकांना मोबाईलवरही न्यूज डंकाच्या बातम्या, लेख, व्हिडियो पाहता येणार आहेत.

न्यूज डंकाचे ऍप डाऊनलोड करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version