घरविशेषराजस्थानमधून जेएफ-१७ चा एक पाकिस्तानी पायलट ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू!

राजस्थानमधून जेएफ-१७ चा एक पाकिस्तानी पायलट ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू!

सुरक्षा दलांकडून त्याची चौकशी सुरु 

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. या कारवाईदरम्यान भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी पायलटला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वैमानिक पाकिस्तानी हवाई दलाच्या जेएफ-१७ लढाऊ विमानात होता. हे लढाऊ विमान भारताने पाडले. या पायलटला राजस्थानच्या लाठी येथून पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी सांगितले की, पायलटला एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले आहे. जिथे त्याची चौकशी सुरू आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी अद्याप वैमानिकाची ओळख सार्वजनिक केलेली नाही, परंतु असे मानले जाते की तो पाकिस्तानी हवाई दलाचा वरिष्ठ अधिकारी असू शकतो. दरम्यान, जेएफ-१७ विमानाचा आणखी एक पायलट भारतीय सीमेत पडला असल्याची बातमीही येत आहे. सुरक्षा दलांकडून त्याचाही शोध सुरु आहे.

दरम्यान, भारत पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानचे अनेक ड्रोन भारताने नष्ट केले आहे. एलओसीवरील पाकिस्तानच्या चौक्यांना भारताने उद्ध्वस्त केले आहे. भारतीय लष्कराने याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

हे ही वाचा : 

भारतावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही!

पाकिस्तानच्या कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर; ५० हून अधिक पाकचे ड्रोन पाडले

भारतातील ८,००० हून अधिक ‘एक्स’ अकाऊन्टस् ब्लॉक करण्याचे आदेश

भारतातील ८,००० हून अधिक ‘एक्स’ अकाऊन्टस् ब्लॉक करण्याचे आदेश

याच दरम्यान, भारताच्या कारवाईवर अनेक देशांनी भारताला पाठींबा दिला आहे. अमेरिकेने तर हात वर केले आहेत. यावर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्धाबाबत ट्रम्प प्रशासनाला किती चिंता वाटते, असे विचारले असता अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स म्हणाले, आम्ही दोन्ही देशावर नियंत्रण ठेवू शकत नाही. दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी थोडंसं प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु आमचे मुलभूत काम नाही, अशा युद्धात आम्ही अडकणार नाही. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अमेरिकेचा काहीही संबंध नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version