घरविशेषराहुल गांधींचा पायगुण चांगला नाही, पंतप्रधान मोदी हे विश्व गौरव पुरुष

राहुल गांधींचा पायगुण चांगला नाही, पंतप्रधान मोदी हे विश्व गौरव पुरुष

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे खर्गेना प्रत्युतर

महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते आज (१० नोव्हेंबर) प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. पंतप्रधान मोदींचा हातगुण चांगला नसल्याचे खर्गे यांनी म्हटले. दरम्यान, खर्गे यांच्या टीकेवर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युतर देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पायगुण चांगला नसल्याचे म्हटले.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, मोदींनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान केला आहे. ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून दिल्लीला पोहचले, त्यांनतर लगेचच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. तसेच मोदी जिथे हात घालतात, तिथे काही तरी अघटीत घडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींचे उद्घाटन केले त्या गोष्टींचे नुकसान झाले असल्याचे खर्गे यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

‘अतुल भातखळकरांच्या लोकप्रियतेत सतत वाढ, रेकॉर्ड मार्जिनने होणार विजय’

लग्न पत्रिकेवर ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा, पंतप्रधान मोदींसह योगींचाही फोटो!

राम मंदिराला विरोध, वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यासोबत उद्धव ठाकरे बसलेत

मॉब लिंचिंग झाले नसल्याच्या दाव्यानंतर आदित्य ठाकरेंवर समाजमाध्यमात टीकेचा भडीमार

यावर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले, हरियाणामध्ये कोणाचा पायगुण चांगला आहे ते त्यांनी आणि देशाने बघितले आहे. त्यामुळे राहुल गांधींचा पायगुण चांगला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्व गौरव पुरुष आहेत. पंतप्रधान मोदी हे असे नेतृत्व आहे जे युगा-युगानंतर विकास कामाकरिता देशामध्ये येत असते. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे युग पुरुष आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version