घरविशेष"थोडीशी लाज शिल्लक असेल तर राहुल गांधींनी माफी मागावी''

“थोडीशी लाज शिल्लक असेल तर राहुल गांधींनी माफी मागावी”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची जोरदार टीका  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) बिहारमधील इंडि आघाडीच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल कथित अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा निषेध केला. या घटनेचा उल्लेख करताना शाह म्हणाले, “मी राहुल गांधींना विनंती करू इच्छितो की जर त्यांच्यात थोडीशीही लाज शिल्लक असेल तर त्यांनी मोदी, त्यांच्या दिवंगत आईची आणि या देशातील जनतेची माफी मागावी. देव सर्वांना सद्बुद्धी देवो.” 

ते पुढे म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी जे घडले ते सर्वांनाच दुःख देणारे आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे ही भारतातील जनता कधीही सहन करू शकत नाही. राजकीय जीवनात यापेक्षा मोठी घसरण असू शकत नाही आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो.” 

राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेला त्यांनी ‘घुसखोर बचाव यात्रा’ म्हणून संबोधले आणि म्हणाले, “काँग्रेस नेत्यांनी घुसखोर बचाव यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द वापरून सर्वात निंदनीय कृत्य केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पासून मुख्यमंत्री बनले आहेत तेव्हा पासून सोनिया गांधी, राहुल गांधी, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, रेणुका चौधरी आणि प्रत्येक काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद शब्द उच्चारले आहेत.”

हे ही वाचा : 

“पुतिनला पाठिंबा देण्याची किंमत भारताला भोगावी लागत आहे”

“मी टोकियोची चायवाली तुम्ही भारताचे चायवाले”

ममता बॅनर्जीं भाषावाद करतायेत, मतदार यादीत रोहिंग्या, घुसखोर अन मृतांची नावे!

“पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा अधिकार नाही”

ते पुढे म्हणाले, कॉंग्रेस नेत्यांना मी सांगू इच्छितो की ”पंतप्रधान मोदींना तुम्ही जितक्या शिव्या द्याल तितके जास्त कमळाचे फुल मोठे होवून आकाशात पोहोचेल.” राजकारणात “द्वेषाची संस्कृती” पसरवण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे, असे म्हणत शाह यांनी आपला हल्ला आणखी वाढवला. राहुल गांधी यांनी ‘घुसपैठिया बचाओ यात्रे’च्या माध्यमातून बिहारमधील लोकांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version