ममता बॅनर्जीं भाषावाद करतायेत, मतदार यादीत रोहिंग्या, घुसखोर अन मृतांची नावे!

भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महातो यांचा आरोप

ममता बॅनर्जीं भाषावाद करतायेत, मतदार यादीत रोहिंग्या, घुसखोर अन मृतांची नावे!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महातो यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, “ममता बॅनर्जी भाषा आधारीत राजकारण करत आहेत, हे त्यांना शोभत नाही. बंगालचा सर्वात मोठा विश्वासघात कोणी केला असेल, तर तो ममता बॅनर्जींनीच.”

महातो यांनी पुढे गंभीर आरोप करत सांगितले की, “बंगालमध्ये सुमारे एक कोटी नव्हे तर दीड कोटी लोक असे आहेत, जे प्रत्यक्षात येथे राहत नाहीत, तरीही त्यांची नावे मतदार यादीत आहेत. यात रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोर, तसेच वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तींचा समावेश आहे. टीएमसीच्या अनेक मंत्र्यांच्या पालकांची नावेही या यादीत आहेत.” ते पुढे म्हणाले, “या सर्वांची नावे मतदार यादीतून वगळली गेली पाहिजेत.”

दरम्यान, काल (२८ ऑगस्ट) कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या कि त्या जिवंत असेपर्यंत कोणालाही मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाहीत. त्यांनी भाजपवर बंगालींवर “भाषिक दहशत” पसरवल्याचा आरोप केला.

हे ही वाचा : 

“पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा अधिकार नाही”

“माफी न मागितल्यास जनता काँग्रेसमुक्त भारत करेल”

तामिळनाडूतील भाजप पदाधिकाऱ्याची टोळक्यांनी मारहाण करून हत्या!

भारत आधीच हिंदू राष्ट्र आहे, त्याला कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही: मोहन भागवत

त्यांनी दावा केला की, भाजपने मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी देशभरातून ५०० हून अधिक पथके पश्चिम बंगालमध्ये तैनात केली आहेत. “तुमचे नाव अजूनही मतदार यादीत आहे की ते वगळण्यात आले आहे हे तुम्ही स्वतः तपासावे,” असे त्या रॅलीत म्हणाल्या. त्यांनी लोकांना सांगितले कि त्यांनी स्वतःकडे आधार कार्ड असल्याची खात्री करावी.

Exit mobile version