घरविशेषभारताने शाहीद आफ्रिदीची लायकी दाखवली, केली 'ही' मोठी कारवाई!

भारताने शाहीद आफ्रिदीची लायकी दाखवली, केली ‘ही’ मोठी कारवाई!

भारत आणि भारतीय सैन्यावर केली होती टिप्पणी

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि भारतीय सैन्यावर आरोप करणाऱ्या शाहिद आफ्रिदीसाठी वाईट बातमी आहे. भारत सरकारने मोठी कारवाई करत त्याची लायकी दाखवून दिली आहे. भारताने माजी पाकिस्तानी कर्णधाराच्या यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. त्यामुळे इथून पुढे शाहिद आफ्रिदीचे भारतातील समर्थक त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर पाहू शकणार नाहीयेत.

शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. आफ्रिदीकडून सतत होणाऱ्या विषारी टीकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एका पाकिस्तानी टीव्ही कार्यक्रमात आफ्रिदीने म्हटले, भारत स्वतःच आपल्या लोकांना मारतो आणि नंतर पाकिस्तानला दोष देतो. यावेळी त्याने भारतीय सैन्याला निरुपयोगी म्हटले होते. शाहीद आफ्रिदीच्या टिप्पणीवर भारतीय संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते.

शिखर धवनने म्हटले, कारगिलमध्ये पण हरवलं होतं, आधीच तुम्ही खालची पातळी गाठली आहे, अजून किती खाली जाणार. उगीचचं कमेंट्स करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं चालवा. आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा प्रचंड अभिमान आहे. भारत माता कि जय, जय हिंद.

हे ही वाचा : 

मी धार्मिक कार्यक्रमांना जात नाही असे नाही, पण मी प्रदर्शन करत नाही!

पहलगाम हल्ल्यानंतर दुःखी झालेली नेहा खान बनली नेहा शर्मा

मोठा निर्णय : राष्ट्रीय जनगणनेत होणार जातीय नोंदणी

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चिन्मय दास यांना जामीन मंजूर!

याच दरम्यान, भारताने मोठी कारवाई करत त्याच्या यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. याआधीही भारत सरकारने अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर कारवाई केली आहे. शाहिद आफ्रिदीच्या आधी, शोएब अख्तर, रशीद लतीफ आणि तन्वीर अहमद सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ही कारवाई केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version