घरविशेषआता एसटी कर्मचारी ठोठावणार अनिल परब यांचे दार

आता एसटी कर्मचारी ठोठावणार अनिल परब यांचे दार

- Advertisement -

राज्यभर पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन आज आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आंदोलक कर्मचारी आज सकाळी ११ वाजता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर जाणार आहेत. कर्मचारी परिवहन मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त करणार आहेत.

दरम्यान अनिल परबांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तर सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, प्रवीण दरेकर यांनी आंदोलनादरम्यान उपस्थिती दर्शवत आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. तसेच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

हे ही वाचा:

…तर ब्रह्मोस क्षेपणास्त्र LACवर कसे नेणार?

सलमान खुर्शीद यांना, हिंदुत्वावर बरळल्यानंतर घरचा आहेर

न्यूझीलंडविरुद्ध भारताची टीम घोषित, कोण आहे नवीन कर्णधार?

खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

शांततेत सुरू असलेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाने आक्रमक भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत असून आज एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आवाहनही केले आहे. मात्र, विलिनीकरणाची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही यावर कर्मचारी वर्गही ठाम आहे. एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर ठाम आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version