घरविशेषहनुमानाच्या आदर्शांचं पालन करत घेतला बदला

हनुमानाच्या आदर्शांचं पालन करत घेतला बदला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या पराक्रमाचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कराने सर्व भारतवासीयांचं मस्तक अभिमानाने उंच केलं आहे. राजनाथ सिंह म्हणाले, “आपल्या सेनांनी शौर्य आणि पराक्रम दाखवत एक नवीन इतिहास रचला आहे. आम्ही अशा त्या हनुमानजींच्या आदर्शाचं पालन केलं आहे, जसं त्यांनी अशोकवाटिका उध्वस्त करताना केलं होतं. आम्ही फक्त त्यांच्यावर कारवाई केली, ज्यांनी आमच्या निष्पाप नागरिकांना ठार मारलं.

संरक्षण मंत्री बुधवारी ६ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा रस्ता संघटनेच्या (बीआरओ) ५० पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, “भारतीय लष्करानं अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलता यांचं दर्शन घडवलं आहे. आम्ही जे लक्ष्य निश्चित केलं होतं, त्याचं अत्यंत नियोजनबद्ध आणि वेळेवर नाश केलं. त्यात कोणत्याही नागरी भागाचं नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आली.

हेही वाचा..

राज ठाकरे काय बोलतात याला काही महत्व नाही!

भारताने करतारपूर कॉरिडोर केला बंद

विवेक ओबेरॉय म्हणतो, अश्रूंचा बदला घेतला

पिक्चर अभी बाकी है!

राजनाथ सिंह यांनी असंही म्हटलं की, “आमच्या लष्कराच्या जवानांनी अचूकता, सतर्कता आणि मानवी मूल्य दाखवली आहेत. त्यासाठी मी सर्व जवानांना आणि अधिकाऱ्यांना देशवासियांच्या वतीने धन्यवाद देतो. तसेच संपूर्ण पाठबळ दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचेही आभार मानतो. ते पुढे म्हणाले, “आपण ‘जिन्ह मोहि मारा, तिन मोहि मारे’ या हनुमानजींच्या आदर्शाचं अनुसरण केलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत आमच्या लष्कराने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कँप नष्ट करून त्यांना ठोस प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने आपल्या भूमीवर झालेल्या हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी ‘प्रतिक्रियेच्या हक्काचा’ वापर केला आहे. ही कारवाई पूर्ण विचारपूर्वक, संयमाने आणि केवळ दहशतवाद्यांच्या तळांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. या दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version