घरविशेषभारताने करतारपूर कॉरिडोर केला बंद

भारताने करतारपूर कॉरिडोर केला बंद

- Advertisement -

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांचा नाश केला. या कारवाईदरम्यान, गृह मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलं की भारताने पुढील आदेश येईपर्यंत करतारपूर कॉरिडोर बंद केला आहे. पंजाबमधील गुरदासपूरचे जिल्हाधिकारी दलविंदरजीत सिंग यांनी सांगितलं की, कॉरिडोर एक दिवसासाठी बंद करण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की पुढील काही दिवसांसाठी कोणताही अधिकृत आदेश प्रशासनाला मिळालेला नाही.

दरम्यान, पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यातील ऐतिहासिक श्री दरबार साहिब गुरुद्वाऱ्याच्या दर्शनासाठी सुमारे १५० भारतीय भाविक इंटीग्रेटेड चेक पोस्ट (ICP)वर पोहोचले होते, मात्र त्यांना घरी परत जाण्यास सांगितलं गेलं. डेरा बाबा नानक (गुरदासपूर) येथील ICP करतारपूर कॉरिडोरपर्यंत पोहोचण्याची सुविधा देते.

हेही वाचा..

विवेक ओबेरॉय म्हणतो, अश्रूंचा बदला घेतला

पिक्चर अभी बाकी है!

अजित डोभाल यांनी अनेक देशांना कोणती माहिती दिली ?

१० मेपर्यंत काही फ्लाइट्स रद्द

एका भाविकाने सांगितलं, “आम्हाला इमिग्रेशन आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी परिस्थिती अनुकूल नसल्याचं सांगितलं आणि सकाळी सुमारे ११ वाजता परत जाण्याचा सल्ला दिला. दरबार साहिब गुरुद्वारा सिख धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळ मानलं जातं, कारण सिखांचे पहिले गुरु ‘गुरु नानक देव’ यांनी आयुष्याची अखेरची १८ वर्षे याच ठिकाणी घालवली आणि याच ठिकाणी त्यांचं निधन झालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी करतारपूर कॉरिडोरचं उद्घाटन केलं होतं. हा एक व्हिसा-मुक्त सीमा मार्ग आहे, जो भारतीय नागरिकांना आणि OCI कार्डधारकांना पाकिस्तान सीमेपासून ४.७ किमी अंतरावर असलेल्या या पवित्र स्थळाच्या दर्शनासाठी विना-व्हिसा प्रवेश देतो. भारतीय लष्करी कारवाईनंतर अमृतसरकडे जाणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना दिल्लीकडे वळवण्यात आलं असून, पंजाबमधील पाकिस्तान सीमेवरील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत.

पंजाब प्रशासनाने पाकिस्तान सीमेलगतच्या भागांतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद केल्याची घोषणा केली आहे. गुरदासपूर आणि पठाणकोट जिल्ह्यातील संस्था तीन दिवसांसाठी बंद राहतील, तर फाजिल्का जिल्ह्यात त्या पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version