घरविशेषचीनच्या कुठल्या प्रयोगाचा पहिला टप्पा पूर्ण...

चीनच्या कुठल्या प्रयोगाचा पहिला टप्पा पूर्ण…

चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या हाय एनर्जी फिजिक्स इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार, अली प्रीफेक्चर (शीत्सांग स्वायत्त प्रदेश) येथील ५,२५० मीटर उंचीवरील एका पर्वतरांगेवर उभारण्यात आलेल्या ‘अली आदिम गुरुत्वाकर्षण तरंग संवेदन प्रयोग’ (AliCPT-1) चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रकाशाचे पहिले निरीक्षण प्राप्त झाले आहे. ही पहिलीच वेळ आहे की चीनने आदिम गुरुत्वाकर्षण तरंगांचे निरीक्षण करण्यासाठी प्रयोग केला आहे. या प्रयोगामार्फत चंद्र आणि गुरु (बृहस्पति) ग्रहांकडून १५० गीगाहर्ट्झ वारंवारतेच्या बँडमधून प्राप्त झालेली विकिरणाची स्पष्ट चित्रे यशस्वीपणे मिळवण्यात आली आहेत. ही बाब चीनसाठी गुरुत्वाकर्षण तरंग शोध क्षेत्रात एक मोठी प्रगती मानली जात आहे.

या प्रयोगातील मुख्य उपकरण म्हणजे ‘अली आदिम गुरुत्वाकर्षण तरंग दूरदर्शक क्रमांक १’ (Ali Primordial Gravitational Wave Telescope No. 1), जो चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या उच्च ऊर्जा भौतिकी संस्थेने, राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळा, तसेच अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठासह १६ चिनी आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांच्या सहकार्याने ८ वर्षांमध्ये विकसित व उभारलेला आहे.

हेही वाचा..

सेनाप्रमुखांनी साधला नव्या कमांड सुभेदार मेजर यांच्याशी संवाद

अरेच्या, कैदी चालवणार पेट्रोल पंप!

समाजसुधाराची मशाल पेटवणारे योद्धा : गोपाळ गणेश आगरकर

नकली खतांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

सध्या या दूरदर्शकाचे स्थापना व डिबगिंग पूर्ण झाले असून, अली व बीजिंग शहरामधील रिमोट कंट्रोल व डेटा ट्रान्समिशन यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. यासोबत संबंधित उपकरणांच्या एंड-टू-एंड कार्यक्षमतेचे व कोनीय विभेदनासारख्या महत्त्वपूर्ण डिझाइन निकषांचे यशस्वी परीक्षण देखील पूर्ण झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version