घरबिजनेसएअर इंडियाला १० हजार कोटींच्या कर्जाची गरज

एअर इंडियाला १० हजार कोटींच्या कर्जाची गरज

कॅशफ्लोमुळे बँकांची चिंता

टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया आपल्या विस्तारासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांचे नवीन कर्ज उभारण्याच्या तयारीत आहे. विमान ताफ्याचा विस्तार, विमानांचे अपग्रेडेशन आणि कंपनीच्या दैनंदिन खर्चासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. मात्र, कंपनीच्या आर्थिक स्थितीमुळे खासगी बँका कर्ज देताना सावध भूमिका घेत आहेत. एअर इंडियाची क्रेडिट रेटिंग मजबूत असली तरी भविष्यातील कॅशफ्लो आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता याबाबत बँकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मार्च २०२६ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात एअर इंडियाचा एकत्रित तोटा २२ हजार २३८ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी हा तोटा १० हजार ८५८ कोटी रुपये होता. म्हणजेच एका वर्षात कंपनीच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, परकीय चलनातील नुकसानही १ हजार ५४५ कोटी रुपयांवरून वाढून ७ हजार ३८८ कोटी रुपये झाले. त्यामुळे कंपनीच्या वाढत्या खर्चासोबतच भविष्यातील रोख प्रवाहाबाबत बँकांची चिंता वाढली आहे.
हे ही वाचा:
शस्त्र सोडले, पुस्तक उचलले; छत्तीसगडमध्ये सात माजी माओवादी दहावी पास

इंडी आघाडीच्या बैठकीकडे आप, डीएमकेची पाठ

८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये

भारतात अखेर ‘ॲपल पे’ची एंट्री

दरम्यान, एअर इंडियावर सध्या सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. सरकारी बँका टाटा समूहाची आर्थिक क्षमता आणि एअर इंडियाची क्रेडिट रेटिंग लक्षात घेऊन कर्ज सुविधा सुरू ठेवण्यास तयार असल्याचे वृत्त आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक या कर्जदार बँकांमध्ये प्रमुख आहेत. दुसरीकडे, खासगी बँका मात्र कंपनीचा कॅशफ्लो आणि भविष्यातील आर्थिक कामगिरी यांचा अधिक बारकाईने आढावा घेत आहेत.

एअर इंडियाच्या पुनर्रचनेसाठी आणि विस्तारासाठी टाटा समूहाकडून मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक केली जात आहे. टाटा सन्सने यापूर्वीच कंपनीमध्ये १० हजार कोटी रुपयांहून अधिक भांडवल गुंतवण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, विमान कंपनीचा विस्तार करताना वाढता खर्च, कर्जाचा भार आणि तोटा नियंत्रित करून व्यवसायाला शाश्वत नफ्यात आणणे हे एअर इंडियासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रस्तावित १० हजार कोटींचे कर्ज कंपनीच्या विस्तारासाठी किती महत्त्वाचे ठरणार आणि बँका त्यासाठी कोणत्या अटी ठेवणार, याकडे आता उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version