घरबिजनेसभारतात अखेर ‘ॲपल पे’ची एंट्री

भारतात अखेर ‘ॲपल पे’ची एंट्री

आयफोन-ॲपल वॉचवरून कॉन्टॅक्टलेस व्यवहार शक्य

अ‍ॅपलने अखेर भारतात आपली बहुप्रतीक्षित डिजिटल पेमेंट सेवा ‘ॲपल पे’ सुरू केली आहे. भारतात डिजिटल व्यवहारांचा वाढता विस्तार लक्षात घेता अ‍ॅपलचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा ॲक्सिस बँकेच्या व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्डधारकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आयफोन आणि ॲपल वॉच वापरणाऱ्या ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांना आता आपले कार्ड थेट डिव्हाइसमध्ये जोडून कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार आहे.

‘ॲपल पे’च्या माध्यमातून दुकानांमध्ये पेमेंट करणे अधिक सोपे होणार आहे. ग्राहकांना प्रत्येक वेळी प्रत्यक्ष कार्ड काढण्याची गरज भासणार नाही. आयफोनवर साइड बटण दोनदा दाबून, फेस आयडी किंवा डिव्हाइस पासकोडच्या मदतीने ओळख निश्चित केल्यानंतर फोन कॉन्टॅक्टलेस पेमेंट मशीनजवळ नेल्यास व्यवहार पूर्ण करता येईल. ॲपल वॉचच्या माध्यमातूनही अशाच प्रकारे पेमेंट करता येणार आहे. ॲपल पे स्वीकारणाऱ्या अ‍ॅप्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही ही सुविधा वापरता येईल. मात्र, सध्या रुपे कार्डांना ॲपल पेचा सपोर्ट उपलब्ध नाही.
हे ही वाचा:
आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपयाची घसरण थांबली

जुलैमध्ये सेवा क्षेत्राचे उत्पादन १३.५ टक्क्यांनी वाढले

भारत-पाक सीमेजवळ महामार्गावर उतरले लष्कराचे हेलिकॉप्टर

भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानींसह पकडले ३ हजार कोटींचे ड्रग्स

सुरक्षेच्या दृष्टीनेही ॲपलने या सेवेत विशेष व्यवस्था केली आहे. ग्राहकांच्या कार्डचा मूळ क्रमांक थेट व्यापाऱ्यांसोबत शेअर केला जात नाही. त्याऐवजी टोकनायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहार केला जातो. त्यामुळे कार्डची माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत होते. सध्या आयफोन एक्सआर आणि त्यानंतरच्या मॉडेल्सवर तसेच काही ॲपल वॉच मॉडेल्सवर ही सुविधा वापरता येणार आहे. भारतात यापूर्वीच यूपीआय, कार्ड आणि इतर डिजिटल पेमेंट सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना ॲपल पेच्या प्रवेशामुळे ग्राहकांना कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. भविष्यात आणखी भारतीय बँका आणि कार्ड नेटवर्क या सेवेशी जोडले जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version