जागतिक तणावामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ

डॉलरमधील घसरण आणि मागणीत वाढ

जागतिक तणावामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ

देशभरात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढताना दिसत आहे. अमेरिका-इराण तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि डॉलरमधील कमजोरी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला असून सोन्याचे दर विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचले आहेत.

भारतीय बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांवर पोहोचला आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १ लाख ३९ हजार रुपये झाला आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये दरात थोडाफार फरक असला तरी सर्वत्र तेजीचे वातावरण कायम आहे. लग्नसराईचा हंगाम आणि गुंतवणुकीसाठी वाढती मागणी यामुळेही सोन्याच्या किंमतींना आधार मिळत आहे.
हे ही वाचा:
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा मोठी उसळी

माझ्या मुलाच्या हत्येत तृणमूलचा हात…

अमेरिकन सैन्याकडून इराणी ध्वज असलेल्या रिकाम्या तेलवाहू जहाजावर हल्ला

भारत-व्हिएतनाममध्ये २०३० पर्यंत २५ अब्ज डॉलर व्यापाराचे लक्ष्य

चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून प्रतिकिलो चांदीचा भाव सुमारे २ लाख ७० हजार रुपयांवर पोहोचला आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी, इलेक्ट्रिक वाहनं, सौरऊर्जा प्रकल्प आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये चांदीचा वाढता वापर यामुळे चांदीच्या किंमतींना मोठी चालना मिळत आहे. गेल्या काही दिवसांत चांदीने हजारो रुपयांची झेप घेतल्याने व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज अर्थात एमसीएक्समध्ये सोन्या-चांदीच्या फ्युचर्स व्यवहारात तेजी कायम आहे. सोन्याच्या फ्युचर्समध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ झाली असून चांदीचे फ्युचर्सही वेगाने वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत असल्याचे चित्र आहे. विशेषतः अमेरिकेतील व्याजदर धोरण, चीनमधील आर्थिक परिस्थिती आणि मध्यपूर्वेतील तणाव यामुळे बाजारात अस्थिरता वाढली असून त्याचा फायदा सोन्याला होत आहे.

Exit mobile version