घरबिजनेसएचडीएफसी बँकेत AT1 बाँड गैरविक्री प्रकरण

एचडीएफसी बँकेत AT1 बाँड गैरविक्री प्रकरण

कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई

एचडीएफसी बँकेने AT1 बाँड मिस-सेलिंग प्रकरणात कर्मचाऱ्यांवर कारवाई करत तीन कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणामुळे बँकेच्या कामकाजावर आणि प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई अंतर्गत चौकशीनंतर करण्यात आली. बँकेच्या परदेशातील (विशेषतः UAE मधील) शाखांमधून काही NRI ग्राहकांना Credit Suisse चे AT1 बाँड्स चुकीच्या पद्धतीने विकल्याचा आरोप होता. या बाँड्समध्ये गुंतवणूक करताना त्यातील जोखीम स्पष्टपणे सांगितली गेली नसल्याच्या तक्रारी अनेक गुंतवणूकदारांनी केल्या होत्या.
हे ही वाचा:
फ्लिपकार्टला मोठा धक्का! IPOपूर्वी ग्रुप CFO श्रीराम वेंकटरामन यांचा राजीनामा

धुरंधर २ मुळे अभिनेता प्रकाश राज अस्वस्थ, रामचरण, अल्लू अर्जुनवर टीका

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

पंतप्रधान मोदींचा आक्षेपार्ह एआय फोटो पोस्ट केल्याप्रकरणी बिहारमधून एकाला अटक

AT1 (Additional Tier-1) बाँड्स हे अत्यंत उच्च जोखीम असलेले आर्थिक साधन मानले जातात. Credit Suisse बँकेच्या संकटानंतर 2023 मध्ये या बाँड्सची किंमत शून्यावर आली होती, ज्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत हे बाँड्स सुरक्षित गुंतवणूक म्हणून विकल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे.

या प्रकरणात बँकेने तीन कर्मचाऱ्यांना, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, सेवेतून काढले आहे. ही कारवाई केवळ शिस्तभंगाची नसून, बँक व्यवस्थापनावर वाढत्या नियामक दबावाचेही संकेत मानले जात आहेत. या आधीही या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांना ‘गार्डनिंग लीव्ह’वर पाठवण्यात आले होते आणि चौकशी सुरू होती.

नियामक संस्थांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दुबईतील नियामकांनी बँकेच्या काही कामकाजावर निर्बंध घातल्याचेही वृत्त आहे. यामुळे बँकेच्या परदेशातील ऑपरेशन्सवर परिणाम झाला आहे.

दरम्यान, या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. बातमी समोर आल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 2.4% घसरण झाली. यापूर्वी बँकेचे अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांच्या अचानक राजीनाम्यानंतरही शेअरवर दबाव दिसून आला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version