घरबिजनेसक्वालकॉम भारतातील १,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार?

क्वालकॉम भारतातील १,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार?

आयटी क्षेत्राला नोकरकपात सुरूच

जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी क्वालकॉमने भारतात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे देशातील सुमारे १,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ९ नोव्हेंबरपासून बंगळुरू येथील कार्यालयात या नोकरकपातीला सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली-एनसीआरमधील कार्यालयांमध्येही याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या कपातीमध्ये अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या वरिष्ठ अभियंत्यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे.

क्वालकॉमच्या भारतातील कार्यालयांमध्ये जवळपास २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ५ ते ६ टक्के कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो. रेडिओ फ्रिक्वेन्सी, ब्लूटूथ, वाय-फाय आणि सॅटेलाइट नेव्हिगेशन यांसारख्या तांत्रिक विभागांमध्येही कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या वेतनाइतकी नुकसानभरपाई आणि सेवाकालावधीनुसार अतिरिक्त रक्कम देण्याची ऑफर दिल्याचे समोर आले आहे. तसेच तीन दिवसांत निर्गमनाची कागदपत्रे स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एका महिन्याचा पगार देण्याची तरतूद असल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
परदेशी नागरिकांसह जाण्यासाठी विद्यार्थीनींना भुलवणारा एनएसयूआय विद्यार्थी निलंबित

व्यवस्था प्रदूषित करणारे मोकाट, एक दिवस फटाके फोडणाऱ्यांवर मात्र टीका 

लायबेरियन ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला; एका भारतीय नागरिकासह चार खलाशी जखमी

“जशी वेळ येईल, तशा गोष्टी समजतील!”

या निर्णयामागे स्मार्टफोन बाजारपेठेतील मंदी हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. क्वालकॉमच्या एकूण महसुलात स्मार्टफोन चिप्सचा वाटा मोठा असून, या व्यवसायाला मागणीतील घसरण आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून वाढणारी स्पर्धा यांचा सामना करावा लागत आहे. कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमोबाईल आणि डेटा सेंटर चिप्सच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या नव्या क्षेत्रांमधून अपेक्षित महसूल मिळवण्यासाठी वेळ लागणार आहे.

दरम्यान, कंपनीने जागतिक स्तरावर कर्मचारी पुनर्रचनेची घोषणा केली असली तरी भारतातील नोकरकपातीचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. त्यामुळे देशातील आयटी आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील रोजगाराच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version