घरबिजनेसम्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीत साडेतीन पट वाढ

म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीत साडेतीन पट वाढ

सहा वर्षांत ३.५ लाख कोटींचा टप्पा पार

भारतीय गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे कल वेगाने वाढत असून, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीने नवा विक्रम केला आहे. गेल्या सहा वर्षांत एसआयपीमधील वार्षिक गुंतवणूक तब्बल साडेतीन पटीने वाढून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. नियमित बचत, आर्थिक साक्षरतेत झालेली वाढ आणि डिजिटल गुंतवणूक सुविधांमुळे एसआयपी लोकप्रिय होत असल्याचे चित्र आहे.

एसआयपीमधील वाढत्या सहभागाचा अंदाज नवीन नोंदणीच्या आकडेवारीवरूनही येतो. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २.७ कोटी नवीन एसआयपी नोंदणी झाल्या होत्या. ही संख्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वाढून ७.२ कोटींवर पोहोचली. ऑगस्ट २०२६ मध्ये तर एसआयपीच्या माध्यमातून एका महिन्यात ३२ हजार २९७ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली. विशेष म्हणजे, एकूण एसआयपी गुंतवणुकीपैकी सुमारे ८४ टक्के हिस्सा इक्विटी आधारित योजनांमध्ये जात आहे. यामुळे शेअर बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत आहे.

हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्याला पुन्हा मोठा धक्का

आठ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीची मंजुरी

ऊर्जा क्षेत्रात २०० लाख कोटींच्या गुंतवणुकीची संधी

भारतीय शेअर बाजाराची सात महिन्यांत ९ लाख कोटींची कमाई

म्युच्युअल फंड उद्योगाच्या विस्तारातही मोठी वाढ झाली आहे. मार्च २०२१ मध्ये ३२ लाख कोटी रुपये असलेली व्यवस्थापनाखालील मालमत्ता अर्थात एयूएम मार्च २०२६ मध्ये ७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्या ६.१ कोटींवर गेली असून, एकूण फोलिओंची संख्या २७.४ कोटी झाली आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक कायम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाणही वाढले आहे. यातून भारतीय गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीकडे वाढता कल स्पष्ट होतो.

दरम्यान, म्युच्युअल फंड उद्योगाची वाढ होत असली तरी देशातील गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी अद्याप उपलब्ध आहे. विशेषतः छोट्या शहरांमध्ये एसआयपीबाबत जागरूकता वाढत असून, भविष्यात या बाजारपेठेत मोठी वाढ अपेक्षित आहे. मात्र, एसआयपीमधील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे केवळ आकर्षक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक न करता स्वतःची आर्थिक क्षमता, जोखीम आणि दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version