घरविशेषविरारमध्ये बंद सदनिकेत तीन भावंडांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

विरारमध्ये बंद सदनिकेत तीन भावंडांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

बोळींज पोलिसांकडून तपास सुरू

विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात आजारपण आणि आर्थिक अडचणींमुळे तीन भावंडांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी पहाटे एका बंद सदनिकेत तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. कुमार मेहता (वय ५०), दीपेश मेहता (वय ५२) आणि खेवणा मेहता (वय ४८) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील गार्डन अव्हेन्यू इमारतीच्या डी विंगमधील १२०३ क्रमांकाच्या सदनिकेत राहत होते. बंद फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाटे अडीचच्या सुमारास दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी तिघांचेही मृतदेह आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे कुटुंब २०२५ पासून या सदनिकेत भाड्याने राहत होते. तिन्ही भावंडे अविवाहित होती. त्यापैकी एका भावाला पक्षाघात झाला होता, तर दुसरा भाऊ कर्करोगाने ग्रस्त होता. गंभीर आजारपण आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे कुटुंब अडचणीत असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी या भावंडांनी एक व्हिडिओ तयार केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा:
नागपूर पदवीधर मतदार संघाने काँग्रेसची लाज राखली

कॅन्सरवरील ८० हजारांचे इंजेक्शन आता ७,१५० रुपयांत!

शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५ लाख कोटींची भर

मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आपल्याकडे पैसे मागितले होते, असे मृतांच्या बहिणीने पोलिसांना सांगितल्याचे समजते. प्राथमिक अंदाजानुसार, तीन ते चार दिवसांपूर्वीच या भावंडांचा मृत्यू झाला असावा. तिघांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास बोळींज पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version