दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगर परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कथित लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी २४ वर्षीय मुस्लीम तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी तरुण एकमेकांच्या संपर्कात होते. मुलगी तिच्या आईचा मोबाइल फोन वापरत असे. सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांना दोघांमधील संपर्काबाबत समजल्याने त्यांचे बोलणे बंद झाले होते. मात्र, सुमारे आठवडाभरापूर्वी आरोपीने पुन्हा मुलीच्या आईच्या मोबाइल क्रमांकावर अनेकदा फोन केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुलीने ओळखीच्या एका व्यक्तीच्या मोबाइलवरून आरोपीशी संपर्क साधला.
यावेळी आरोपीने मुलीला फिरायला जाण्याचे सुचवले. मुलीने क्लासेस आणि शाळेचे कारण देत बाहेर जाण्यास नकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिला बाहेर जाण्यास मनवले. त्यानंतर दोघे मंडपेश्वर येथून मेट्रोने मालाडला गेले आणि पुढे आक्सा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यानंतर आरोपीने मुलीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. मुलीने विरोध करूनही त्याने तिच्या खासगी अवयवांना स्पर्श केला. अखेर मुलीने आरडाओरडा करण्याची धमकी दिल्यानंतर प्रकरण अंगलट येण्याची भीती वाटल्याने आरोपीने तिला परत आणले. घरी परतल्यानंतर मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांशी समन्वय साधला. यादरम्यान, एफआयआर नोंदवून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. अखेर समन्वयानंतर पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमधील नोंदीनुसार, कथित घटना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान घडल्याचे नमूद आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना २४ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता मिळाली. एफआयआर २५ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३९ वाजता नोंदवण्यात आली आहे. माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडे पाठपुरावा सुरू होता. पहाटे अडीचच्या सुमारास पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
हे ही वाचा:
बंगालच्या उपसागरात भारत-सिंगापूरचा संयुक्त ‘सिम्बेक्स’ युद्धाभ्यास
अमली पदार्थ तस्करीच्या ‘डेथ ट्रायंगल’वर प्रहार
विशेष मुलांच्या आई स्वाती मोहिते यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’
मुंबईकरांनो, उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक!
पोक्सो कायद्यानुसार कारवाई; पुढील तपास सुरू
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६५(१), ७४ आणि ७५ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो), २०१२ मधील कलम ४, ८ आणि १२ नमूद करण्यात आली आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या कुटुंबीयांची माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पुढे कठोर कारवाई केली जाणार का, तसेच आरोपीच्या कथित कृत्याच्या पार्श्वभूमीवर बुलडोझर कारवाई होणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
