घरक्राईमनामाबोगस 'आयएएस'ची दीडशे जणांना कोट्यवधींची 'टोपी'!

बोगस ‘आयएएस’ची दीडशे जणांना कोट्यवधींची ‘टोपी’!

मुंबईत गुन्हा दाखल

नवी दिल्लीतील स्टाफ सिलेक्शन कमिटीमध्ये कार्यरत असल्याचा बनाव रचून एका व्यक्तीने कर सहाय्यक आणि निरीक्षक पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत १५० हून अधिक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये तक्रारदाराच्या ३६ नातेवाईक आणि मित्रांचाही समावेश आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील रहिवासी असलेल्या तक्रारदाराच्या फिर्यादीवरून सहार पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी नीलेश राठोड नावाच्या तोतया अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईतील रहिवासी संतोष खरपुडे (५५) यांच्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये त्यांचा मित्र रवींद्र ठाकरे याने त्यांची नीलेश राठोड याच्याशी ओळख करून दिली. राठोडने स्वतःला दिल्लीतील स्टाफ सिलेक्शन कमिटीत काम करणारा आयएएस अधिकारी असल्याचे भासवले. खरपुडे यांनी पोलिसांना सांगितले की, “मी राठोडला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटलो. त्याने मला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. माझ्या माध्यमातून, माझे ३६ नातेवाईक आणि मित्रांनीही राठोड याला पैसे दिले, कारण त्याने एका महिन्यात नियुक्तीपत्रे देण्याचे आश्वासन दिले होते.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ ते २०२४ या दोन वर्षांदरम्यान खरपुडे यांच्यासह त्यांचे ३६ नातेवाईक आणि मित्रांची २.९ कोटी रुपयांची फसवणूक झाली. चौकशीत पुढे आले की, संशयिताने कर सहाय्यक आणि कर निरीक्षक या पदांसाठी नियुक्तीपत्र (ऑफर लेटर) देण्यासाठी प्रत्येक पीडिताकडून ४ ते ७ लाख रुपये उकळले होते.
दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही कोणालाही नोकरी मिळाली नाही.

त्यामुळे खरपुडे यांना संशय आला आणि त्यांनी राठोडबद्दल चौकशी केली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. राठोडने केवळ खरपुडे यांच्याच नव्हे, तर एकूण १५० जणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने सहार पोलिसांशी संपर्क साधून नीलेश राठोडविरुद्ध तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : 

“पेडण्याची पुनाव : ७ ऑक्टोबरला रंगणार परंपरा, श्रद्धा आणि जल्लोषाचा अनोखा संगम”

अहिल्यानगर: ‘आय लव्ह मोहम्मद’ वाद, ३९ जणांना अटक, २०० जणांवर गुन्हा दाखल!

सेबीने फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी नियम कडक

अंधश्रद्धेतून मित्राची धारदार शस्त्राने हत्या

सहार पोलिसांनी या बोगस आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध २६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला असून, पोलीस सध्या संशयित नीलेश राठोडला अटक करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version