घरक्राईमनामायुद्धादरम्यान दिशाभूल करणारी सामग्री शेअर केल्याबद्दल युएईमध्ये १९ भारतीयांना अटक

युद्धादरम्यान दिशाभूल करणारी सामग्री शेअर केल्याबद्दल युएईमध्ये १९ भारतीयांना अटक

तुरुंगवास किंवा दंड भरण्याची होणार शिक्षा

इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण असा संघर्ष शिगेला पोहचलेला असतानाच याचा फटका काही आखाती देशांना देखील बसला आहे. युद्धामुळे वाढलेल्या तणावादरम्यान सोशल मीडियावर दिशाभूल करणारी आणि बनावट सामग्री असलेले व्हिडिओ क्लिप पोस्ट केल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) अधिकाऱ्यांनी ३५ जणांना अटक केली आहे. या ३५ जणांमध्ये १९ भारतीयांचा समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांनी यापूर्वी रहिवाशांना वारंवार इशारा दिला होता की, त्यांनी हल्ल्याच्या ठिकाणांचे चित्रीकरण करू नये, फुटेज शेअर करू नका किंवा पडताळणी न केलेली माहिती ऑनलाइन प्रसारित करू नका. यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १५ मार्च रोजी, युएईचे अॅटर्नी- जनरल डॉ. हमाद सैफ अल शम्सी यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीयत्वाच्या लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आणि त्यांच्यावर जलदगतीने खटला चालवण्याचे निर्देश दिले. विविध आरोपांखाली अटक केलेल्यांमध्ये १९ भारतीय देखील आहेत. शम्सी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक अराजकता भडकवण्यासाठी आणि एकूण स्थिरता बिघडवण्यासाठी बनावट माहिती आणि कृत्रिम सामग्रीचा प्रसार थांबवण्याच्या उद्देशाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर कडक देखरेख ठेवण्यात आली होती.

हे ही वाचा:

ट्रम्प यांना दणका; ब्रिटन, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा नौदल पाठवण्यास नकार

पाकिस्तानच नाही तर, ब्रिटन मलेशियामध्येही पोहचवली भारतासंबंधीची माहिती

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वाजले बिगुल; ४ मे रोजी निकाल

तीन राज्यांमध्ये स्फोट घडवण्याचा कट उधळला; आरडीएक्स, आयईडीसह तिघांना अटक

शम्सी म्हणाले की, अशा कृती कायद्यानुसार गुन्हे आहेत आणि त्यासाठी किमान एक वर्षाचा तुरुंगवास आणि किमान १,००,००० दिरहम दंड होऊ शकतो. “अशा घटनांचा गैरवापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जात आहे, ज्याचा उद्देश जनतेची जाणीवपूर्वक दिशाभूल करणे आणि राष्ट्रीय सुरक्षा, सुव्यवस्था आणि स्थिरता बिघडवणे आहे,” असे शम्सी म्हणाले. त्यांनी सांगितले की, सरकारी वकिलांनी प्रतिवादींची चौकशी सुरू केली असून त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version