घरक्राईमनामाइमारतीच्या खोदकामातून काढलेली माती अंगावर कोसळली

इमारतीच्या खोदकामातून काढलेली माती अंगावर कोसळली

दोन मजूर ठार,तीन जखमी

भायखळा परिसरात एका इमारतीच्या पायाभरणी आणि पाइलिंगच्या कामा दरम्यान मातीचा मोठा ढिगारा मजुरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन मजूर ठार झाले असून तीन मजूर जखमी झाले आहे,जखमींवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

….तर बीबीसीवर ५ अब्ज डॉलर्सपर्यंत खटला

क्रिएटिविटी ही भारताच्या विकास यात्रेची प्रमुख शक्ती

कारची मोकाट जनावराला धडक : तिघांचा मृत्यू

१२ राज्यात मतदारयादीचे SIR सुरू

मिळालेल्या माहितीनुसार भायखळा पश्चिम येथील हबीब मॅन्शन, हंस रोड या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू आहे, या बांधकामाच्या ठिकाणी पाया खोदण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी दुपारी खड्यातून माती काढण्याचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा मजुरांवर पडल्याने पाच मजूर त्यात दाबले गेले.
या दुर्घटनेनंतर तातडीने मजुरांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, पाच जखमींपैकी राहुल ( ३०) आणि राजू ( २८) या दोघांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

सज्जाद अली (२५), सोबात अली (२८) आणि लाल मोहम्मद (१८) हे तिघे जखमी असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version