घरक्राईमनामामाहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

भरधाव दुचाकी धडकली

माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी मोटारसायकलवरून पनवेलच्या दिशेने निघालेल्या २८ वर्षीय तरुणाचा कुर्ला पश्चिम सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोड येथे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांकडून बेस्टबस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय गुणवंत पाटील (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे.अजय हा मालाड पश्चिम येथे कुटूंबियासह राहण्यास होता.

वडापावचा व्यवसाय करणाऱ्या अजयची पत्नी ६ महिन्याच्या मुलासह दिवाळी सणाला पनवेल येथे माहेरी गेली होती. अजय हा मंगळवारी सकाळीच पत्नीला घेण्यासाठी मालाड येथून मोटारसायकलवरून पनवेलच्या दिशेने निघाला होता.

हे ही वाचा:

विक्रोळीत घरात घुसून अतिप्रसंग करू पाहणाऱ्या अनासला चोप

प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर

पुण्यात प्रियकराकडून सॉफ्टवेअर इंजिनिअरची निर्घृण हत्या

वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; ५३ चेंडूंत २०४ धावा!

कुर्ला पश्चिम सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड येथे भरधाव वेगात असलेल्या अजयचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून पुढे चाललेल्या एका टेम्पोला त्याच्या मोटारसायकल ची जोरदार धडक बसली. या धडकेनंतर अजय रस्त्यावर कोसळला आणि थेट बेस्ट बसच्या पुढील व मागील चाकांच्या मधोमध आला. बसच्या उजव्या बाजूच्या मागील एक्सलजवळ आल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीसांनी कंत्राटी बेस्टबस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version