पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी हा निर्णय घेतला. दुष्काळाची स्थिती लक्षात घेता संमेलन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
हे ही वाचा:
विक्रोळीत घरात घुसून अतिप्रसंग करू पाहणाऱ्या अनासला चोप
अरुणाचल सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये दहा दिवस चर्चा
विद्यार्थी क्रीडा केंद्र, सरस्वती कन्या संघाला मुंबई जिल्हा अजिंक्यपद!
दुसऱ्या कसोटीपूर्वी न्यूझीलंडला धक्का; टिकनर बाहेर
डॉ. लिंबाळे यांच्या साहित्यातून सामाजिक अन्याय, जातीय भेदाभेद, समाजाचे वास्तव यावर प्रभावीपणे लेखन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट जिल्ह्यातील होन्नूर येथे लिंबाळे यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना जातीय विषमतेचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी अशा परिस्थितीतही स्वतःला एक साहित्यिक म्हणून घडविले. त्यांच्या अनुभवांचा ठसा त्यांच्या साहित्यात उमटलेला दिसतो.
