घरराजकारणप्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर

प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर

रामदास आठवलेंचा मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन ऐक्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना थेट आपल्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची ऑफर दिली आहे. आगामी २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीतील विविध गटांनी एकत्र यावे आणि एकच मजबूत रिपब्लिकन पक्ष उभा राहावा, अशी भूमिका आठवले यांनी मांडली आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेत योग्य प्रतिनिधित्व आणि न्याय मिळवून द्यायचा असेल, तर प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र येणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षातील छोटे-मोठे सर्व गट एकाच पक्षात विलीन करून एकसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निर्माण करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. विशेष म्हणजे, प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

पुस्तकांचा खजिना वाचकांच्या भेटीला! मुंबई पुस्तक महोत्सवाला सुरुवात

विधानसभेसाठी पंजाबमध्ये भाजपा-अकाली दलाची युती

पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस

पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?

आठवले यांच्या मते, दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेदांमुळे आंबेडकरी चळवळीचे ऐक्य प्रत्यक्षात येऊ शकलेले नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ऐक्याच्या प्रस्तावाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र, एकत्र येण्याची आपली तयारी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

२०२९ च्या निवडणुकांपूर्वी रिपब्लिकन पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात राजकीय समीकरण जुळणार का, हा आता महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. आठवले यांच्या या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version