घरराजकारणविधानसभेसाठी पंजाबमध्ये भाजपा-अकाली दलाची युती

विधानसभेसाठी पंजाबमध्ये भाजपा-अकाली दलाची युती

सहा वर्षांनंतर दोन्ही पक्ष एकत्र

पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (२४ नोव्हेंबर) दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यावेळी उपस्थित होते. या घोषणेमुळे तब्बल सहा वर्षांनंतर दोन्ही पक्षांची राजकीय आघाडी पुन्हा अस्तित्वात आली आहे. अकाली दलाचे एनडीएमध्येही पुनरागमन झाले आहे.

भाजपा आणि अकाली दल यांची युती १९९६ पासून सप्टेंबर २०२० पर्यंत कायम होती. मात्र, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत अकाली दलाने सप्टेंबर २०२० मध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकारने हे तिन्ही कृषी कायदे मागे घेतले.

अमित शाह यांनी पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येवर विशेष भर दिला. पंजाबला अमली पदार्थमुक्त करणे हे युतीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत अमली पदार्थांची समस्या संपवण्याचे लक्ष्यही त्यांनी जाहीर केले. याशिवाय भ्रष्टाचार संपवणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे आणि हिंदू-शीख बंधुभाव मजबूत करणे यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस

पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?

मेरठमधून दहशतवादी कनेक्शन असलेल्या उजैदला अटक

हिजाबशिवाय गाणे म्हणणाऱ्या गायिकेला इराणमध्ये चाबकाचे फटके

अमित शाह यांनी पंजाबमधील आम आदमी पार्टी (आप) सरकारवर टीका केली आणि हे सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असल्याचे म्हटले. शाह म्हणाले की, पक्षाने सत्तेवर आल्यानंतर तीन महिन्यांत अमली पदार्थांचे निर्मूलन करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ही समस्या कायम राहिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version