घरविशेषपुस्तकांचा खजिना वाचकांच्या भेटीला! मुंबई पुस्तक महोत्सवाला सुरुवात

पुस्तकांचा खजिना वाचकांच्या भेटीला! मुंबई पुस्तक महोत्सवाला सुरुवात

संगीत, साहित्य, मनोरंजनाचेही कार्यक्रम

मुंबईकर वाचकांसाठी पुस्तकांची मोठी पर्वणी आजपासून (२४ नोव्हेंबर) सुरू होत आहे. मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात २९ नोव्हेंबरपर्यंत हा सहा दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात २०० हून अधिक प्रकाशक, ६०० पेक्षा जास्त पुस्तकांचे स्टॉल आणि विविध भाषांमधील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध असेल.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी-इंडिया) यांच्या वतीने महाराष्ट्र सरकार, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवादरम्यान १०० हून अधिक सत्रे होणार असून, त्यात साहित्यिक चर्चा, लेखकांशी संवाद, पुस्तक प्रकाशन सोहळे आणि काव्यवाचनाचा समावेश असेल.

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी स्वतंत्र बालविभाग उभारण्यात येणार आहे. कथाकथन, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा, चित्रकला आणि इतर संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वंदे मातरम्‌च्या १५० वर्षांनिमित्त, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २००व्या जयंतीनिमित्त विशेष संकल्पनाधारित प्रदर्शनेही भरवण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

विधानसभेसाठी पंजाबमध्ये भाजपा-अकाली दलाची युती

पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस

पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?

मेरठमधून दहशतवादी कनेक्शन असलेल्या उजैदला अटक

महोत्सवात दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. उद्घाटनाच्या दिवशी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे. त्यानंतर कैलाश खेर, केरळमधील थायक्कुडम ब्रिज बँड आणि विक्रम हजरा यांच्यासह विविध कलाकारांचे कार्यक्रम सादर होतील. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, दररोज सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत तो खुला राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version