घरक्राईमनामाविक्रोळीत घरात घुसून अतिप्रसंग करू पाहणाऱ्या अनासला चोप

विक्रोळीत घरात घुसून अतिप्रसंग करू पाहणाऱ्या अनासला चोप

कपडे विकण्याच्या बहाण्याने केले विकृत कृत्य

दुपारच्या वेळी घरात एकटीच असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर फेरीवाल्याने घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी विक्रोळी पूर्व परिसरात घडला. पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेत मुलीची सुटका केली आणि संबंधित नराधम फेरीवाल्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद अनास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद अनास हा कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. मंगळवारी दुपारी तो विक्रोळी पूर्व येथील एका चाळीत कपडे विकण्यासाठी आला होता. दुपारची वेळ असल्याने चाळीत शुकशुकाट होता. हीच संधी साधत त्याने एका घरात १३ वर्षीय मुलगी एकटी असल्याचे पाहिले. त्यानंतर आरोपीने घरात प्रवेश करून मुलीचा विनयभंग करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

अरुणाचल सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये दहा दिवस चर्चा

पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड

प्रियांश आर्यची टी-२०मध्ये ऐतिहासिक १८१ धावांची खेळी

पुस्तकांचा खजिना वाचकांच्या भेटीला! मुंबई पुस्तक महोत्सवाला सुरुवात

या अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने स्वतःचा बचाव करण्यासाठी मदतीसाठी जोरात आरडाओरडा केला. मुलीचा आवाज ऐकताच चाळीतील रहिवासी तातडीने तिच्या घराकडे धावले. संतप्त रहिवाशांनी मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली आणि फेरीवाल्याला घराबाहेर ओढून चांगलाच चोप दिला.

घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रहिवाशांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. विक्रोळी पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्नास याच्याविरुद्ध बळजबरीने घरात प्रवेश करणे आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम चव्हाण यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version