भाग रहेमान भाग…

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथवण्यात आली तेव्हा भारतातील अनेकांना गुदगुल्या होत होत्या. अनेकांना इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तशीच क्रांति होत असल्याची स्वप्ने पडू लागली. त्या क्रांतिचा सध्या बांगलादेशात कडेलोट होतो आहे. हसीना भारतात आश्रयाला आल्यापासून बांगलादेश सतत धगधगतोय. जनता पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. निवडणुकीनंतर सत्तेवर आलेले तारीक रेहमान यांना लवकरच हसीना यांच्यासारखा पळ काढावा लागणार असे चित्र आहे. बांगलादेशात जेन झी क्रांती घडवणारे क्रांतिकार सध्या रेहमान यांच्यावर डोळे वटारयात. डिसेंबर महिन्यात बांगलादेशात परतणार अशी घोषणा शेख हसीना यांनी केली होती. त्या केव्हा परतणार हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु त्या आधीच तारीक रेहमान यांचे आसन डगमगू लागले आहे. बांगलादेशातील ६४ पैकी २८ जिल्हे धगधगतायत. नोव्हेंबर २०२६ च्या मध्यातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version