घरक्राईमनामा२०२० दिल्ली दंगल प्रकरणात ‘आप’चा ताहिर हुसेन दोषी

२०२० दिल्ली दंगल प्रकरणात ‘आप’चा ताहिर हुसेन दोषी

दुकानाची लूट, जाळपोळ प्रकरणात निकाल

२०२० मधील ईशान्य दिल्ली दंगल प्रकरणात आम आदमी पक्षाचा (आप) माजी नगरसेवक ताहिर हुसेन याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दयालपूर परिसरात दुकानाची लूट आणि जाळपोळ केल्याच्या प्रकरणात दंगलीला चिथावणी दिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. १० ऑक्टोबर रोजी कडकडडूमा न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणातील अन्य १२ आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

हे प्रकरण दयालपूर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर क्रमांक १२०/२०२० शी संबंधित आहे. २४ फेब्रुवारी २०२० रोजी इरशाद अली यांनी दुकान लुटल्याची तक्रार केली होती. दंगलखोरांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि आग लावली, असा आरोप होता. दुकानातील वस्तूंच्या लुटीमुळे १७ ते १८ लाख रुपये, तर इमारतीच्या नुकसानीमुळे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारदाराने सांगितले.

हे ही वाचा:

कॅप्टन स्मित यांच्यावरील हल्ल्याची एनआयए करणार चौकशी

केजरीवालांसह ममता बॅनर्जींना पोलिसांनी घेतले ताब्यात

‘कॉक्रोच’ना ताब्यात घेतल्यावर प्रवासी म्हणाले, स्वच्छ भारत अभियान

सौर वादळाचा पृथ्वीला तडाखा! भारतावर काय परिणाम?

दुसरे तक्रारदार मोहम्मद जाहिद यांनी दंगलखोर ताहिर हुसेनच्या नावाने घोषणा देत असल्याचे सांगितले. तपासादरम्यान दोन पोलीस कॉन्स्टेबलनीही त्याला ओळखले. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४८ आणि १४९ अंतर्गत दंगल, कलम ४२७ अंतर्गत मालमत्तेचे नुकसान, कलम ४३६ अंतर्गत आग लावून नुकसान आणि कलम १२०बी अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप होते.

ताहिर हुसेनला २१ एप्रिल २०२० रोजी मंडोली कारागृहात औपचारिकरीत्या अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो अन्य एका दिल्ली दंगल प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होता. ताहिर हुसेन याच्याविरोधातील ही दुसरी दोषसिद्धी आहे. यापूर्वी गुप्तचर विभागाचे (IB) कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणातही त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version