घरक्राईमनामाअभिनेता धनुषकडून ‘या’ कारणासाठी २० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

अभिनेता धनुषकडून ‘या’ कारणासाठी २० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

प्रोडक्शन हाऊस ‘थेनंड्ल फिल्म्स’ यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव यांच्या १० कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणानंतर आता तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता-निर्माता धनुष हा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. वृत्तांनुसार, प्रोडक्शन हाऊस ‘थेनंड्ल फिल्म्स’ (Thenandal Films) यांनी त्याला कायदेशीर नोटीस पाठवून २० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. हा वाद २०१६ मध्ये बाहेर आला होता. अद्याप पूर्ण न झालेल्या चित्रपट प्रकल्पाशी संबंधित हे प्रकरण आहे.

नोटिसनुसार, धनुष यांनी “नान रुद्रम” नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, प्रोडक्शन हाऊसचा आरोप आहे की, नंतर त्यांनी या प्रकल्पातून माघार घेतली. त्यावेळी त्यांनी कंपनीसाठी दुसरा चित्रपट करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यातही कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. प्रोडक्शन हाऊसचा दावा आहे की, या प्रकल्पामुळे सुमारे २० कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये अॅडव्हान्स पेमेंट आणि प्री- प्रोडक्शन खर्चाचा समावेश आहे. तसेच, कलाकार नागार्जुन आणि एस जे सूर्या यांना मानधन अदा करण्यात आले होते. मात्र प्रकल्प ठप्प झाल्याने हा सर्व गुंतवणूक खर्च वाया गेला.

थेनंड्ल फिल्म्स यांनी असा आरोपही केला आहे की, पूर्ण स्क्रिप्ट सादर न करणे आणि इतर व्यावसायिक बांधिलकांना प्राधान्य देणे हे प्रकल्प लांबणीवर पडण्याचे मुख्य कारण होते. कायदेशीर नोटिसीत धनुष यांना एका आठवड्यात स्पष्ट करायला सांगितले आहे की ते हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी तारखा देणार का. अन्यथा, खर्चाची परतफेड आणि अतिरिक्त १ कोटी दंडासह पुढील कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; दिल्लीतील शाळांना बॉम्बच्या धमक्यांबाबतचेही मिळाले पुरावे

पंतप्रधान मोदींचे C- 130 विमान हायवे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीवर उतरले

“शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी राहुल गांधींचे खोटे कथानक”

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा देखील एका वादात अडकला आहे. एक्सेल एन्टरटेंनमेंट यांनी “डॉन- ३” या चित्रपटातून रणवीर सिंह बाहेर पडल्यानंतर प्री- प्रोडक्शनमधील नुकसानाचा दाखला देत सुमारे ४० कोटींची भरपाई मागितली आहे. मात्र, रणवीर सिंग याच्या टीमने हे दावे फेटाळून लावत प्रोडक्शन हाऊसच्या तयारीतील त्रुटींवर बोट ठेवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version